आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day Plans : असा सेलिब्रेट होणार आहे तैमूरचा पहिला वाढदिवस, हे होणार आहेत सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः करीना-सैफ यांचा मुलगा तैमूर अली खानचा लवकरच पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे पतौडी आणि कपूर कुटुंबीय तैमूरच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक आहेत. तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन होणार असा अंदाज बांधला जात होता. पण एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करीनाने तिच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसाचे प्लान्स सांगताना या दिवशी एक छोटेखानी पार्टी होणार असल्याचे सांगितले आहे. कुटुंबीयांसोबत मिळून तैमूरचा वाढदिवस साजरा करायचे करीना आणि सैफ यांनी ठरवले आहे. ही एखादी बॉलिवूड पार्टी नसेल, असे तिने सांगितले. 


करीना म्हणाली, हा तैमूरचा पहिला वाढदिवस आहे. पॅरेंट्स आणि ग्रॅण्ड पॅरेंट्ससोबत तो हा खास दिवस साजरा करेल.


तैमूरच्या बर्थडे पार्टीत हे होणार आहे सहभागी...
- रिपोर्ट्सनुसार, तैमूरच्या बर्थडेला तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि करण जोहरचे ट्विन्स यश आणि रूही सहभागी होऊ शकतात. याशिवाय त्याचे आजी-आजोबा म्हणजे बबिता आणि रणधीर कपूर, शर्मिला टागोर  आणि सोहा-कुणालची मुलगी इनाया नाउमी खेमू उपस्थित राहतील.
-  20 डिसेंबर, 2016 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तैमूरचा जन्म झाला.  


पुढील स्लाईड्सवर बघा, सैफ-करीनासोबतचे तैमूरचे आणखी काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...