आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरमध्ये आहेत पठाणी जीन्स, करीनाने शेअर केले गरोदरपणातील व आई झाल्यानंतरचे अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या करीनाने यावेळी गरोदरपणातील व आई झाल्यानंतरचे काही अनुभव शेअर केले. तैमूरबद्दल  ती भरभरून बोलली. गरोदरपणीसुद्धा ब्रेक न घेणाऱ्या करीनाने आई झाल्यानंतर अवघ्या 4.-45 दिवसांतच कामाला सुरुवात केली आहे. 'आई झाल्यानंतरचा प्रत्येक दिवस मी भरभरून जगतेय,' असे ती म्हणाली. 
'गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक नवीन डायट फॉलो करते आहे. पण, माझे वजन बहुतेक तैमूरमुळेच कमी होईल. कारण, मी त्याला घेऊन बसले की तो रडायला सुरुवात करतो. जणू तो हेच सांगतो की एका जागी बसणे तुझ्या फायद्याचे नाही. तुला चालत राहायला हवे. तो मला सतत पळवत असतो. चालणे हा प्रकार त्याला आतापासून आवडतोय हे पाहून मला बरे वाटते.'
 
हा आहे करीनाचा पोस्ट प्रेग्नेंसी डाएट
सध्या बेबो बॅलेंस्ड डाएट फॉलो करत आहे. बाजरीच्या भाकरीसोबत एक वाटी भाजी, तूप आणि गुळ करीनाच्या डाएटमध्ये आहे. मसुरची डळ, राजमा आणि छोले करीनाचे आवडते पदार्थ आहेत. इतकेच नाही तर भूक लागल्यास करीना एक वाटी खिचडीसुद्धा जेवणात घेतेय. रात्रीच्या वेळी टीव्ही बघताना ती एक मोठा ग्लास दुध घेते. दुध हे व्हिटॅमिन डीचा मोठा सोर्स असल्याचे ती सांगते. यावेळी करीनाची डाएटिशिअन ऋजुताने सांगितले, जर करीनाला कधी अल्कोहोल ड्रिंक करायचे असेल, तर ती ऋतुजाला तीन दिवसांपूर्वीच सांगते. त्यानुसार, ऋजुता तिचे डाएट चेंज करुन देत असते.  
 
तैमूरला घेऊन जाणार शूटिंग सेटवर 
करीनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले, की तैमूरजवळ माझ्या किंवा सैफपैकी एकजण नेहमीच सोबत असतो. जेव्हा सैफ बाहेर असतो, तेव्हा मी तैमूरची काळजी घेते. आता मी इंटरव्ह्यू देतेय, तर सैफ तैमूरची काळजी घेतोय. सैफने त्याची एक मीटिंग पुढे ढकलली आहे. आमच्या दोघांपैकी एकजण नेहमी त्याच्याजवळ हजर असावे, यावर आमचा भर असतो. भविष्यात असे शक्य झाले, नाही तर मी त्याला माझ्या शूटिंग सेटवर सोबत घेऊन जाणारेय.  
 
जास्त तूप खाल्याने तैमूर झाला सुंदर 
करीनाने तैमूरविषयी सांगितले, की तो एक अमेजिंग बेबी आहे. त्याचे लूक्स खूप सुंदर आहेत. त्याच्यात पठाणी जीन्स आहेत. प्रेग्नेंसीच्या काळात मी खूप साजूक तुप खाल्ले. त्यामुळे तैमूर खूप सुंदर झाला.  
 
पुढे वाचा,  करीनाला हवी आहे झिरो फिगर..
प्रेग्नेंसीच्या काळात वजन वाढल्याची नव्हती चिंता... 
प्रेग्नेंसीत खूप खाल्ले पराठे आणि पिज्जा... 
या पदार्थांचे आवर्जुन करा सेवन... यासह बरेच काही.. 
बातम्या आणखी आहेत...