आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफच्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी करीनाने सोडले मौन, म्हणाली...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या केदारनाथद्वारे तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. साराच्या डेब्यूविषयी करीनाने अखेर मौन सोडले आहे. 

साराला करीना सल्ला देणार का? 
सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून याबाबत तिला काही सल्ले देणार का, असा प्रश्न करीनाला एका कार्यक्रमात विचारला गेला. यावेळी करीना म्हणाली की, ‘सारा अजून तरुण असून, सिनेमात तिचे करिअर उज्ज्वल आहे.’

करीना पुढे म्हणाली, ‘सारा अतिशय हुशार आहे. अभिनय तर तिच्या रक्तामध्ये आहे. ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. हुशारी आणि सौंदर्याच्या जोरावर ती बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल, यावर माझा विश्वास आहे.’

पुढे वाचा, साराच्या बॉलिवूड डेब्यूविषयी काय होते सैफचे म्हणणे... 
बातम्या आणखी आहेत...