आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनी मोठ्या सैफ अली खानसोबत लग्नापूर्वी करीना कपूरने ठेवली होती एक अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री करीना कपूरने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले, की सध्या विश्रांतीच्या मूडमध्ये नाहीये. करीना आता प्रेग्नेंट असून येत्या डिसेंबर महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. याकाळात विश्रांती न घेता करीना कामाला प्राधान्य देतेय. करीनाने तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठ्या असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती. याचवर्षी मार्च महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने ही गोष्ट मीडियापुढे उघड केली होती. काय होती करीनाची अट...

महिला दिनाच्या सेलिब्रेशन इव्हेंटमध्ये 35 वर्षीय करीनाने मीडियाला सांगितले होते, "आज मी पत्नी आहे, उद्या कदाचित आईसुद्धा होऊल. मात्र आयुष्यभर मी काम करुन पैसे कमावणार आहे. यासाठी माझे पती मला नेहमीच पाठिंबा देतील. याच अटीवर मी त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार झाली होती."

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाली करीना...
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत जेव्हा करीनाला प्रेग्नेंसीच्या काळात कामापासून ब्रेक घेणार का? असा प्रश्न विचारला, तेव्हा तिने उत्तर दिले, "नाही, असा माझा काही मूड नाहीये. मी जर अभिनेत्री नसते आणि शेफ किंवा आणखी दुसरे काम केले असते, तेव्हासुद्धा मी काम करत राहिले असते. मला अभिनय करणे पसंत आहे. त्यामुळे मी कामापासून स्वतःला वेगळे करु शकत नाही."

करीना 'वीरे दी वेडिंग' या सिनेमासाठी काम करत आहे. ती म्हणते, "सिनेमाचे शूटिंग कुठल्या दिवशी सुरु होणार, यावर चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर मध्ये कदाचित ते सुरु होईल. यामध्ये माझे पोस्ट डिलिव्हरी सीन शूट होणार आहेत."

सैफची दुसरी पत्नी आहे करीना
करीना सैफची दुसरी पत्नी आहे. दोघांचे लग्न 16 ऑक्टोबर 2012 रोजी झाले होते. सैफच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे. सैफपूर्वी शाहिद कपूरसोबत करीना रिलेशनशिपमध्ये होती. मात्र शाहिदपासून विभक्त झाल्यानंतर सैफसोबत तिचे सूत जुळले आणि दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

सैफ-करीनाची लव्ह स्टोरी
2007 मध्ये शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफसोबत करीनाची जवळीक वाढायला सुरुवात झाली होती. 'ओमकारा' या सिनेमात ही जोडी झळकली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली होती.

ओमकारानंतर यशराज बॅनरच्या 'टशन' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर दोघांमधील जवळीक बघायला मिळाली. शूटिंगमधून वेळ काढत दोघे लाँग वॉकला जायचे. दोघांच्या अफेअरविषयी गॉसिपिंग सुरु झाले, मात्र दोघांनी आपले नाते काही स्वीकारले नाही. पण लॅक्मे फॅशन वीकच्या काळात दोघे एका गाडीतून कार्यक्रम स्थळी पोहोचले आणि येथेच पहिल्यांदा सैफने करीनासोबतचे आपले नाते स्वीकारले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सैफ-करीनाचे रोमँटिक क्षण खास छायाचित्रांमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...