आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड फंक्शनमध्ये मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचल्या करीना आणि रेखा, वळल्या कॅमे-याच्या नजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री  करीना कपूर तिच्या फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा स्टायलिश अवतार कायम लक्ष वेधून घेणारा असतो. अलीकडेच करीना मुंबईत आयोजित फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी तिने व्हाइट नेट असलेला बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. इतकेच नाही तर जेव्हा बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. रेखा व्हाइट कलरच्या साडीत सोहळ्यात पोहोचली. विशेष म्हणजे यावेळी रेखाने करीनाच्या ड्रेसशी मिळतीजुळती साडी परिधान केली होती. रेड कार्पेटवर दोघी बराच वेळ एकत्र होत्या. रेखा आणि करीना यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. दोघींनी एकत्र फोटोग्राफर्सना पोजही दिल्या. 


बघा, रेड कार्पेटवर क्लिक झालेली रेखा आणि करीना यांची ही खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...