आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Album: संजयची दुसरी पत्नी होती करिश्मा, 9 वर्षांतच तुटले नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः करिश्मा कपूरचा नवरा संजय कपूरने बांद्रा कौटुंबिक न्यायालयात नव्याने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत करिश्मावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. केवळ पैशांसाठी करिश्माने आपल्यासोबत लग्न केल्याचे संजयने याचिकेत म्हटले आहे.
2003 मध्ये करिश्माचे संजय कपूरसोबत लग्न झाले होते. 11 मार्च 2005 रोजी त्यांची मुलगी समायराचा जन्म झाला. तर 12 मार्च 2010 रोजी करिश्माने मुलगा कियानला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी करिश्मा तिची आई बबिताकडे मुंबईत परतली. तेव्हापासून ती मुंबईत आईकडेच वास्तव्याला आहे. केवळ सात वर्षेच करिश्माचा संसार टिकला. आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे.

2012 पासून वेगळे आहेत करिश्मा-संजय
- 2012 मध्ये हे दोघे वेगळे झाले. 2003 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. हे करिश्माचे पहिले तर संजयचे दुसरे लग्न होते.
आता कुणाशी जुळले आहे करिश्माचे नाव?
- संदीप तोश्नीवालसोबत. संदीप एका फार्मास्युटिकल कंपनीचे सीईओ आहेत.
- संदीप विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव अश्रिता आहे. अश्रिता एक डेंटिस्ट आहे.
- बातम्यांनुसार, संदीपला पत्नीकडून घटस्फोट हवाय, मात्र त्यासाठी अश्रिता तयार नाही.
कोण आहे संजय कपूर?
- Sixt इंडिया (Sona Mobility Services Ltd.) चे सीईओ आहेत.
- सोना कोयो स्टियरिंग सिस्टिम्स लिमिटेडचे वाइस चेअरमन आहेत. ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे.
- याशिवाय 16 प्लांट्स भारतात, 3 जर्मनी आणि एक युएसएमध्ये आहे.
आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे संजय?
- संजय पेज थ्री पर्सनॅलिटी आहे. बॉलिवूडच्या अनेक पार्टीज आणि फॅशन शोमध्ये ते दिसतात.
-संजयचे नाव सध्या मॉडेल प्रिया चटवालसोबत जुळले आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, किती धुमधडाक्यात झाले होते संजय-करिश्माचे लग्न...