Home »Gossip» Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapoor Is All Set To Marry Priya Sachdev

करिश्मासोबत घटस्फोटानंतर आता तिस-यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करतोय संजय कपूर

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 16:56 PM IST


मुंबईः अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर पुन्हा एकदा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. नात्यात आलेल्या दुराव्यामुळे करिश्मा आणि तिचा पती संजय कपूर या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. करिश्मापासून फारकत घेतल्यानंतर संजय कपूरने त्याची तथाकथित प्रेयसी प्रिया सचदेवसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

संजय कपूरच्या निकटवर्तीयांनीच याबाबतचा खुलासा केला आहे. एप्रिल महिन्यात प्रिया आणि संजय एका समारंभात न्यूयॉर्कमध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय कपूरचे हे तिसरे लग्न...
करिश्मा कपूरपुर्वी संजय कपूरचे लग्न डिझायनर नंदिता महतानीसोबत झाले होते. नंदितासोबत घटस्फोटानंतर दहा दिवसांनी संजयने करिश्मासोबत लग्नाची घोषणा केला होती. पण दुर्दैवाने हे लग्नही फार काळ टिकले नाही. आता प्रिया सचदेवसोबत संजय तिस-या लग्नाची तयारी करतोय.

पुढे वाचा, फार्मा कंपनीच्या सीईओला डेट करतेय करिश्मा...

Next Article

Recommended