बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने अमेरिकेत तिची छेड काढून तिला त्रास देण्यात आल्याचा आरोप केला आहे. ही घटना लॉस एंजल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात घडली. रविनाने ट्विटद्वारे या घटनेबाबत माहिती दिली. रविनाने ट्विटमध्ये म्हटले की, LA (लॉस एंजल्स) मध्ये इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशनदरम्यान दोन दिवस चांगले गेले. पण दुःखद घटना म्हणजे शेवट वाईट झाला. सर्व काही ठीक सुरू होते. पण त्याचवेळी एक मद्यधुंद व्यक्ती स्टेजवर आला. त्या व्यक्तीचे नाव नीरज अग्निहोत्री असे आहे. त्याने घाणेरड्या भाषेत कमेंट्स करत चुकीचे वर्तन करण्यास सुरुवात केली. नेमके त्यावेळी सेक्युरिटी गार्ड्स स्टेजच्या खाली होते. त्यामुळे त्यांना लगेचच स्टेजवरून खाली उतरवता आले नाही. हे कृत्य करणारा व्यक्ती आयोजकांपैकीच एक होता आणि त्याच्या मुलांना माझ्याबरोबर कारमध्ये येऊ दिले नाही, त्यामुळे तो नाराज होता. सेक्युरिटी आणि प्रोटोकॉलमुळे त्यामुलांना गाडीत बसवता आले नाही, असे रविनाने सांगितले.
तसं पाहता बॉलिवूड अभिनेत्रींसोबत छेडछाडीची ही पहिली घटना नाहीये. अनेक अभिनेत्रींबरोबर अशा घटना घडल्या आहेत. चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर या अभिनेत्रींना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. अनेकदा गर्दीचा फायदा घेत काही लोक अभिनेत्रींच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताता. अशा घटनांमुळे अभिनेत्रींवर लाजिरवाणे होण्याची वेळ येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर अशा प्रकारच्या घटना घडल्या...