मुंबई- अलीकडेच बॉलिवूड स्टार्स आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांच्या तब्बल 12 तास लव्ह मेकिंग सीन शूट करण्यात आला. हा सीन आगामी 'फितूर' या सिनेमातील आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फिल्मसिटी स्टुडिओत हा सीन चित्रीत करण्यात आला. यामध्ये नूर (आदित्य रॉय कपूर) आणि फिरदौस (कतरिना कैफ) एका पार्टीतून गुपचुप बाहेर पडतात आणि नूरच्या गरी जातात. येथे फिरदौस नूरने तयार केलेली छायाचित्रे बघून अवाक् होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून जातात.
या सीनसाठी आदित्य आणि कतरिनाने चार तास रिहर्सल केली होती. मात्र तरीदेखील शॉट परफेक्ट होण्यासाठी त्यांना अनेकदा रिटेक द्यावे लागले. एकंदरीत हा इंटिमेट सीन चित्रीत होण्यासाठी 12 तासांचा अवधी लागला.
येणा-या दिवसांत या जोडीवर आणखी काही किसींग सीन्स चित्रीत होणार असल्याचे म्हटले जाते. श्रीनगर (काश्मीर) येथे झालेल्या शूटिंगवेळीसुद्धा दोघांवर किसींग सीन्स चित्रीत करण्यात आले होते.
अभिषेक कपूर दिग्दर्शित हा सिनेमा चार्ल्स डिकेंस यांच्या 'द ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारित आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फितूरच्या शूटिंगची निवडक छायाचित्रे...