आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif And Aditya Roy Kapur Interview In Jaipur

कतरिना कैफच्या सहा बहिणी, म्हणाली - \'माझ्यावर आहे बहिणींची जबाबदारी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणींसोबत कतरिना कैफ - Divya Marathi
बहिणींसोबत कतरिना कैफ

जयपूरः बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ रविवारी जयपूरमध्ये होते. हे दोन्ही कलाकार यावेळी जॅकब रोड स्थित एका हॉटेलमध्ये आपल्या आगामी 'फितूर' या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसले. यावेळी दोघांनीही आपले अनुभव भास्करसोबत शेअर केले.
वाचा मुलाखतीत आपल्या बहिणींविषयी काय म्हणाली कतरिना...
प्रश्नः तुमच्या दोघांच्या आयुष्यात कोणत्या अशा व्यक्ती आहेत, ज्यांचा आनंद आणि दुःख तुम्ही कॉम्प्रोमाइज करु शकत नाही, ते तुमचे वीक पॉइंट आहेत?
कतरिनाः माझे कुटुंब माझा वीक पॉईंट आहे. माझ्या सहा बहिणी माझ्यासाठी एंजलपेक्षा कमी नाहीत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या आनंदासाठी मी काहीही करु शकते. त्यांना कोणताही त्रास झालेला मला सहन होत नाही.
आदित्यः माझ्यासाठी माझे भाऊ आणि बहिण अतिशय महत्त्वाचे आहेत. याशिवाय माझे जुने मित्र, स्कूल फ्रेंड माझ्या आयुष्यातीस महत्त्वाचा भाग आहेत.
आयुष्य आणि प्रेमाचा गोड शेवट याविषयी तुमचे काय विचार आहेत. वयाच्या 50-60 व्या वर्षी तुम्ही स्वतःला कुठे बघता, आयुष्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?
कतरिनाः
वयाच्या 50-60 व्या वर्षी मी जास्त हॅपी, पीसफुल लाइफ, नॉलेज, चांगला लाइफ पार्टनर आणि मुले नक्की बघू इच्छिते. कुटुंबीयांसाठी आनंद आणि सिक्युरिटी मला हवी आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीसुद्धा मला स्वतःला बिझी ठेवायचे आहे. मला अमेरिकन अॅक्ट्रेस जेन फौंडाकडून प्रेरणा मिळते. ती आजही फिट आहे. मलासुद्धा त्यावयात स्वतःला फिट ठेवायचे आहे.
आदित्यः लोकांना आपली हॅपी लाइफच हवी असते. आयुष्य संपावे, असे कुणालाही वाटणार नाही. मात्र ते शक्य नाही. मला एक लविंग पार्टनर हवा आहे.
या आहेत कतरिनाच्या सहा बहिणी
कतरिनाला एकुण सहा बहिणी असून स्टेफनी, मैलिसा, सोनिया, क्रिस्टीन, नताशा आणि इजाबेला ही त्यांची नावे आहेत. या सर्वजणी दीड वर्षांपूर्वी क्रिस्टिनच्या लग्नात एकत्र दिसल्या होत्या. इजाबेला कतरिनासोबत नेहमीच बॉलिवूड पार्टीजमध्ये दिसत असते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आदित्य-कतरिनाची प्रमोशनदरम्यान क्लिक झालेली छायाचित्रे आणि सोबतच कतरिनाच्या फॅमिलीची छायाचित्रे...