आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षाची असताना अशी दिसायची ही बॉलिवूड सुंदरी, सात बहिणींमधील आहे एक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री कतरिना कैफने फेसबुकनंतर इंस्टाग्रामवरही आपले अकाउंट उघडले आहे. कतरिनाच्या चाहत्यांना यामुळे चांगलाच आनंद झाला आहे. एव्हाना सेलिब्रेटींनीही तिचे इंस्टा- ग्रामवर स्वागत केले. कतरिनाने आता इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली आहे.
 
नुकतेच कतरिनाने एका मासिकासाठी हॉट फोटोशुट केले आहे. यानंतर कतरिनाने तिच्या लहान पणीचा एक फोटो शेअर केला आहे.लहानपणीचा फोटो शेअर करताना तिने "Just found this, the 12 year old me was quite the poser..." असे कॅप्शन दिले आहे. 
 
20 वर्षाची असताना कतरिनाने बूम 2003 चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. मुळची हाँगकाँगची असेलल्या कतरिनाने बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी हिंदीचे धडे घेण्यास सुरुवात केली. याकामी तिला एक्स बॉयफ्रेंड सलमानने फार मदत केली. 
 
कतरिना आणि सलमान यांचे अफेअर चांगलेच गाजले. पण काही काळानंतर रणबीर कपूरसोबत कतरिनाचे सूत जुळले. आता रणबीर सोबतही कतरिनाचे ब्रेकअप झाले आहे. कतरिना सध्या सिंगल असून तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. 
 
कतरिनाला 6 बहिणी आहेत. तीन बहिणीतिच्यापेक्षा मोठ्या तर तीन तिच्यापेक्षा लहान आहेत. कतरिनाचे वडिल मुळचे काश्मिरी होते. 
 
आता कतरिना सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है' या चित्रपटात दिसून येणार आहे.
 
 कतरिनाने आतापर्यंत 'मैंने प्यार क्यों किया'(2005), 'नमस्ते लंदन'(2007), 'पार्टनर'(2007), 'वेलकम'(2007), 'राजनीति'(2010), 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'(2011), 'मेरे ब्रदर की दुल्हन' (2011) , 'एक था टाइगर'(2012), 'जब तक है जान'(2012), 'धूम 3'(2013), 'बैंग-बैंग'(2014), 'बार बार देखो'(2016), 'फितूर'(2016) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कतरिनाचे Childhood Photos..
बातम्या आणखी आहेत...