आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओह माय गॉड... कतरिनाची उधळपट्टी, केस रंगवण्यासाठी उधळले तब्बल 55 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ - Divya Marathi
कतरिना कैफ
मुंबई. 'फितूर' या आगामी सिनेमात कतरिना कैफचा लाल रंगाच्या केसांचा लूक लोकांच्या पसंतीस पडत आहे. परंतु तिचा हा लूक सिनेमाच्या निर्मात्यांना महागात पडला आहे. अलीकडेत याचा खुलासा झाला आहे, की कतरिनाने केसांना लाल कलर देण्यासाठी जवळपास 55 लाखांचा खर्च केला आहे.
लंडनमध्ये कलर केले केस...
केवळ केस कलर करण्यासाठी 55 लाख रुपयांची रक्कम खूप मोठी आहे. परंतु इतका खर्च तिला भारतात नव्हे लंडनमध्ये केस कलर केल्याने आला आहे. कतरिनाला भारतात कोणताच कलर एक्सपर्ट मिळाला नाही, म्हणून तिने लंडनच्या एका प्रसिध्द कलर एक्सपर्टकडून केस रंगवून घेतले.
जोपर्यंत सिनेमाचे शूटिंग सुरु होते, तोपर्यंत कलर कोट करण्यासाठी कतरिनाला वारंवार लंडनवारी करावी लागली. याचा सर्व खर्च निर्मात्यांनी उचलला. कतरिना नेहमी फर्स्ट क्लासमध्येच प्रवास करते आणि तिला राहण्यासाठी 5 स्टार हॉटेल हवे असते. त्यामुळे तिच्या हेअर कलरपेक्षा जास्त तिच्या ट्रिपचा खर्च झाला.
दिग्दर्शक अभिषेक कपूरचा 'फितूर' सिनेमात कतरिना कैफ एक काश्मिरी तरुणी फिरदौसची भूमिका साकारत आहे. ही भूमिका रिअल बनवण्यासाठी दिग्दर्शकाने तिचे केस कलर करण्याचा निर्णय घेतला. हा सिनेमा 12 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कतरिना कैफच्या लाल केसांच्या लूकचे फोटो...