आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina, Kareena, Salman: These Unseen Photos Show What Goes In The Making Of Bollywood Films

कॅटने असे केले होते \'बूम\'चे शूटिंग, तुम्ही पाहिले आहेत का स्टार्सचे हे 12 Unseen Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बूम' या सिनेमाच्या सेटवर कतरिना कैफ (लाल वर्तुळात) - Divya Marathi
'बूम' या सिनेमाच्या सेटवर कतरिना कैफ (लाल वर्तुळात)

मुंबईः 'चमेली' या सिनेमाच्या सेटवर शॉट देण्यासाठी तयार होणारी करीना कपूर, मध्यरात्री 'एक पहेली लीला'च्या शूटिंगसाठी रवाना झालेली सनी लिओन, जॉन अब्राहम स्टारर 'पाप' सिनेमाच्या सेटवर स्पॉट बॉयने बाटलीने दिलेला धबधब्याचा इफेक्ट... हे सर्वकाही तुम्ही पाहिले आहे का... सिनेमाच्या सेटवरील असेच काही रंजक बिहाइंड द सीन्स फोटोग्राफर फौजान हुसैन यांच्या 'द सिल्व्हर स्क्रिन अँड बियॉन्ड' या नवीन पुस्तकात बघायला मिळणार आहेत.
इंडिया टुडे आणि मिड डे या मीडिया हाऊसेसमध्ये काम करणारे प्रसिद्ध फोटोग्राफर फौजान गेल्या 12 वर्षांपासून सिनेमाच्या सेटवरील छायाचित्रे क्लिक करत आहेत. याची सुरुवात कशी झाली, याविषयी फौजान सांगतात, "फिल्ममेकर गोविंद निहलानी यांनी मला 'देव' या सिनेमातील दंगलीचा सीन रिअॅलिस्टिक बनवण्यासाठी अॅप्रोच केले होते. मीडियाशी संबंधित असल्याने मी सिनेमातील दंगल कव्हर करायला गेलो. अमिताभ बच्चन आणि करीना कपूर यांच्यावर तो सीन चित्रीत होत होता. यानिमित्ताने मला सिनेमाच्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. मी सेटवर कॅमेरा आणण्याची परवानगी घेतली आणि 'देव'चे मेकिंग सीन्स शूट केले. त्यानंतर मला सिनेमांचे बिहाइंड द सीन्स शूट करण्याचे सुचले."
12 वर्षांचा प्रवास
2004 मध्ये रिलीज झालेल्या 'देव'पासून ते 'चमेली', 'बूम', 'मुन्नाभाई सीरिज', 'फॅशन' आणि लवकरच रिलीज होणा-या 'हेट स्टोरी 3' पर्यंत... गेल्या 12 वर्षांपासून फौजान यांचा हा प्रवास सुरु आहे. सिनेमाच्या सेटवर सर्व छायाचित्रे एकत्रित करुन त्यांनी गेल्याच आठवड्यात पुस्तक लाँच केले. 300 पानांचे हे पुस्तक लवकरच ऑन लाइन उपलब्ध होणारेय. याची किंमत 400 रुपये इतकी आहे. divyamarathi.com शी बोलताना फौजान यांनी या यूनिक फोटोजमागे असलेल्या कतरिना कैफ, शाहरुख खान या स्टार्सशी निगडीत रंजक गोष्टीही सांगितल्या.
'बूम'च्या सेटवर कतरिना नव्हे पद्मा लक्ष्मी होती लाइमलाइटमध्ये..
आज कतरिना कैफ बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र 'बूम' या सिनेमाच्या शूटिंगवेळी परिस्थिती वेगळी होती. तिला इंडस्ट्रीत फारसे कुणी ओळखत नव्हेत. आज जे अटेंशन तिला मिळते, ते त्यावेळी मिळत नव्हते. फौजान सांगतात, ''सिनेमात प्रसिद्ध मॉडेल्सना कास्ट करण्यात आले होते. त्यापैकी एक होती पद्मा लक्ष्मी. तिला सेटवर बरेच महत्त्व मिळायचे. तिला कॅमेरा स्पेससुद्धा अधिक मिळाली. कतरिनाकडे कुणाचे लक्षही नसायचे.''
जेव्हा फोटो क्लिक करताना कतरिना झाली अनकम्फर्टेबल
'फँटम' या सिनेमाच्या सेटवर फौजान कतरिनाचे फोटो क्लिक करायला गेले तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. फौजान म्हणाले, ''फँटम या सिनेमापर्यंत कतरिना नावाजेलली अभिनेत्री बनली. तिच्याकडे बरीच सुरक्षा व्यवस्था असते. एकेदिवशी जेव्हा मी सेटवर तिचे फोटो क्लिक करत होतो, तेव्हा क्रू मेंबरने मला फोटो काढण्यास मज्जाव केला. कारण कतरिना अनकम्फर्टेबल फिल करत होती.''
शाहरुखच्या विनम्र स्वभावामुळे झाले प्रभावित
फौजानने 2000 साली शाहरुख खान स्टारर 'जोश' या सिनेमातील मेकिंग सीन्स कॅप्चर केले होते. सेटवर शाहरुखचा विनम्र स्वभाव बघून ते प्रभावित झाले होते. फौजान सांगतात, ''त्यावेळीसुद्धा शाहरुख मोठा स्टार होता. इतर स्टार्सच्या उलट त्याने आपल्या बिझी शेड्युलमधून माझ्यासाठी वेळ काढला. आणि एक्सक्लूझिव्हली माझ्यासाठी फोटो काढले. प्रोफेशन असल्यामुळे त्याने मला म्हटले, अर्धा तास तुमचा आहे. तुम्हाला जितके फोटो काढायचे तेवढे काढा. हे शूट मुंबईच्या फिल्मसिटीत झाले होते. तेथे गोव्याचा सेट उभा करण्यात आला होता. कारवर उभे राहून मी शाहरुखला पोज द्यायला सांगितले, त्याने लगेचच माझे म्हणणे ऐकले आणि मला पोज दिल्या.''
फौजान यांच्या कॅमे-यात क्लिक झालेले सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर, अमिताभ बच्चन, सनी लिओन यांचे यूनिक फोटोज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...