आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keralas First International Bikini Model Resmi R Nair

या मॉडेलने PLAYBOY साठी केलंय फोटोशूट, सुरु केले होते 'KISS ऑफ लव्ह' कॅम्पेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोचीः केरळची एकमेव इंटरनॅशनल मॉडेल रश्मी नायर हिने गेल्यावर्षी 'किस ऑफ लव्ह' कॅम्पेन सुरु करुन चर्चा एकवटली होती. कोचीमधील एका कॅफेत रश्मी आणि तिचा पती राहुल पशुपालन या जोडप्याने एकमेकांना किस केले होते. याविरोधात एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली होती. तसेच प्रेमी युगुलाला देखील मारहाण केली होती. यातूनच ‘किस ऑफ लव्ह’ या कॅम्पेनचा जन्म झाला. मोठ्या संख्येने तरुणाई यात सामील झाली. काही ठिकाणी आंदोलनेही झाली. फेसबुक पेज तयार करण्यात आले. या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रेमी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी उघडपणे चुंबन घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
संपूर्ण देशात या कॅम्पेनची चर्चा झाली होती. ही कॅम्पेन उघडणारी रश्मी नायर ही मॉडेल असून तिने 'प्लेबॉय' या प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. कोल्लम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणा-या रश्मीने चेन्नई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय मिस सोशल कॉन्टेस्टमध्ये ती सहभागी झाली आहे.
'किस ऑफ लव्ह' कॅम्पेनपूर्वीसुद्धा रश्मी आपल्या अनेक हॉट फोटोशूट्समुळे प्रसिद्धीझोतात राहिली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, केरळची इंटरनॅशनल बिकिनी मॉडेल राहिलेल्या रश्मी नायरचे Photos...