आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्लूपासून ते गंगोत्रीपर्यंत, 23 वर्षांत एवढी बदलली \'खलनायक\'ची Star Cast

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षित - Divya Marathi
माधुरी दीक्षित
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आपल्या गाजलेल्या 'खलनायक' या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी सुभाष घई या सिनेमाचा हीरो संजय दत्तसोबत मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. याविषयी घई म्हणाले, "आम्ही सिक्वेलच्या निर्मितीविषयी एक करार साइन केला आहे. सिनेमाचे शूटिंग यावर्षीच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरु होईल."

सुभाष घई यांनी सांगितले, "जेव्हा संजय दत्त पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेर आला होता, त्यावेळी आमची या सिनेमाविषयी चर्चा झाली होती. त्याने सिनेमाच्या बॅकग्राऊंड म्युझिकचा एक साउंडट्रॅकसुद्धा बनवला होता, जो मला पसंत पडला होता."

सुभाष घई यांनी सिनेमात नवीन बदल करण्यात येणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, सिनेमाची कथा आजच्या काळानुरुप असेल. जुन्या सिनेमातील 'नायक नहीं खलनायक हूं...' हे गाणे नवीन सिनेमातही ठेवण्यात येईल. मात्र 'चोली के पीछे क्या है...' या गाण्याविषयी अद्याप निर्णय व्हायचा आहे.

नवीन असेल दिग्दर्शक
नवीन दिग्दर्शकाच्या खांद्यावर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची माहिती घई यांनी दिली. जुन्या सिनेमाच्या शेवटापासून सिनेमाची नवीन कहाणी सुरु होईल. जेथे बल्लू (संजय दत्त) कोर्टासमोर आत्मसमर्पण करतो. आता खलनायकाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चला तर मग पाहुयात 'खलनायक' सिनेमातील कलाकार आता सिनेमाच्या रिलीजच्या 23 वर्षांनंतर कसे दिसतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, आता किती बदलली 'खलनायक'ची स्टारकास्ट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...