आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 49 वर्षांचा झाला अक्षय, पाहा कुटुंबाबरोबर घालवतो असा क्वालिटी टाइम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्विंकल खन्ना, डिम्पल कपाडिया, मुलगी नितारा आणि मुलगा आरवसह अक्षय कुमार. - Divya Marathi
ट्विंकल खन्ना, डिम्पल कपाडिया, मुलगी नितारा आणि मुलगा आरवसह अक्षय कुमार.
मुंबई - बॉलीवूड अॅक्टर अक्षय कुमारचा आज 49 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसरमध्ये झाला होता. त्याने अॅक्शन हिरो म्हणून बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. पण आता अक्षय सर्वप्रकारचे चित्रपट करतो. अक्षय त्याच्या कामाबरोबरच कुटुंबालाही भरपूर वेळ देणाऱ्या अॅक्टर्सपैकी एक आहे. दरवर्षी अक्षयचे 3-4 चित्रपट प्रदर्शित होतात. यावर्षी आतापर्यंत त्याचे 'एअरलिफ्ट', 'हाउसफुल्ल-3' आणि 'रुस्तम' रिलीज झाले आहेत.

व्यस्त असूनही कुटुंबाला देतो वेळ
आकडेवारीवर नजर टाकता वर्षभरात येणारे अक्षयचे चित्रपट पाहता तो चांगलाच बिझी राहत असणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर जाहिराती आणि शुटिंगशिवाय इतर कामे सांभाळूनही तो कुटुंबाला भरपूर वेळ देत असतो. बिजी शेड्यूलमधून वेळ काढून तो पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी निताराला कधी शॉपिंगला तर कधी आऊटिंगला घेऊन जातो.

ट्विंकलसाठी नेहमी फ्री!
अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला जवळपास 16 वर्षे झाली आहेत. पण आजही अक्षय नेहमी ट्विंकलसाठी वेळ काढत असतो. अॅवॉर्ड फंक्शनपासून ते पार्टींजपर्यंत अक्षय-ट्विंकल यांची जोडी कायम सोबत असते. अक्षय संपूर्ण कुटुंबाबरोबर सुटीवरही जायलाही कधी विसरत नाही. काही दिवसांपूर्वी दोघांनी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. त्यात या कपलची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

आरवलाही देतो वेळ..
मुलासाठी पित्याने वेळ काढणे किती गरजेचे आहे, हे अक्षय कुमारला चांगलेच ठाऊक आहे. अक्षय मुलगा आरवबरोबर मित्रासारखे नाते जपतो. तो अनेकदा आरवला चित्रपट दाखवायलाही घेऊन जात असतो. अक्षयला स्वतःला देखिल स्पोर्ट्सची आवड आहे. त्यामुळे तो आरवलाही एखाद्या खेळात सहभागी व्हायचा सल्ला देत असतो. वेळ मिळाला की ते दोघे व्हॉलीबॉलही खेळतात.

अक्षयची मुलगी आहे नितारा...
अक्षय कुमारला जवळपास 4 वर्षांची नितारा नावाची एक मुलगी आहे. अनेकदा अक्षय तिला घेऊन जाताना पाहायला भेटला आहे. निताराचे काही फोटो अक्षय कुमार अपलोड करत असतो. पण तो मुलांना मीडियापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अक्षय कुटुंबाबरोबर कसा घालवतो वेळ...
बातम्या आणखी आहेत...