आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • OMG! This Is How Much Akshay Kumar Charged For His Next? You Won’t Be Able To Guess It!

OMG! एका फिल्मसाठी \'खिलाडी\' घेतोय 56 कोटी, वाचा कसा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारने दिग्दर्शिका दिव्या कुमार खोसलाचा एक चित्रपट साइन केला आहे. त्यासाठी त्याने तब्बल 56 कोटी घेतल्याचे समजते. दिव्याचे मागचे दोन्हीही चित्रपट सरासरी चालले तरीही तिने अक्षयला एवढी मोठी रक्कम दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिग्दर्शक म्हणून दिव्याचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी तिने 'यारिया' आणि 'सनम रे'चे दिग्दर्शन केले होते. हे दोन्हीही चित्रपट सुमार चालले. त्यामुळे दिव्याचे जास्त कौतुक झाले नाही. दिव्याने यापूर्वी प्रोड्यूसर म्हणूनही काम केले आहे. तिने 'रॉय' हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. या आगामी चित्रपटाकडून तिला अपेक्षा आहेत.

अक्षयने मात्र याबाबत अद्याप काहीच सांगितलेले नाही. दिव्या आणि अक्षय कुमारने यापूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र काम केले नसले तरी, सहकलाकार म्हणून ते यापूर्वी एकत्र आलेले आहेत. या दोघांनी 'फिल्म 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' आदी चित्रपटात काम केले होते. 56 कोटी घेतल्याचे वृत्त खरे आहे की, खोटे याबाबत अद्याप अक्षयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

विशेष म्हणजे अक्षयने 'जॉली एलएलबी-2' साठी 42 कोटी रुपये घेतल्याची बातमी आली होती. अर्थातच आता बॉलिवूडमध्ये अक्षयचा भाव चांगलाच वाढला आहे. त्याचे अलीकडेच रिलीज झालेले 'एअरलिफ्ट' आणि 'हाऊसफूल 3' हे सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. शंभर कोटींच्या घरात पोहोचलेला 'हाऊसफूल 3' हा अक्षयच्या करिअरमधील पाचवा सिनेमा ठरला आहे. गेल्या 25 वर्षांपासून अक्षयने सिल्व्हन स्क्रिनवरची आपली जादू कायम ठेवली आहे.
गेल्या 25 वर्षांपासून अक्षयने सिल्व्हन स्क्रिनवरची आपली जादू कायम ठेवली आहे. कॉमेडी असो वा देशभक्ती, अक्षयने प्रत्येक सिनेमात स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. एकीकडे तो 'बेबी' आणि 'हॉलिडे' यांसारख्या देशभक्तीवर आधारित सिनेमात दिसतो, तर दुसरीकडे 'सिंह इज ब्लिंग' आणि 'ब्रदर्स' या मसालापटांमध्येही तो तीच कमाल दाखवतो. अक्षयने इंडस्ट्रीत आज जे स्थान पटकावले आहे, तिथवर पोहोचायला त्याला बराच संघर्ष आणि मेहनत करावी लागली आहे. दिल्लीच्या चांदनी चौकच्या गल्लीपासून ते बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपर्यंतचा त्याचा हा प्रवास खूप रंजक आहे.
जाणून घेऊयात, अक्षयविषयीच्या A to Z गोष्टी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...