बॉलिवूडच्या दोन स्टार किड्समध्ये चांगलेच भांडण झाले आहे. मात्र हे भांडण समोरासमोर नव्हे तर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून झाले आहे. आम्ही बोलतोय ते श्रीदेवीची लाडकी लेक खुशी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमविषयी. हे दोघेही चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वीच इब्राहिमनने खुशी आणि अनुराग कश्यपची मुलगी आलियासोबतचे एक छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंवर शेअर केले होते. मोठ्या संख्येने हे छायाचित्रे व्हायरलसु्द्धा झाले होते. मात्र आता दोघांच्या मैत्रीला जणू कुणाची नजर लागली आहे.
एका बॉलिवूड वेबसाइटनुसार, दोघांमध्ये चांगलेच वाजले. खुशीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका छायाचित्रावर इब्राहिमने कमेंट दिल्यानंतर या भांडणाला सुरुवात झाली. इब्राहिमने लिहिले, मला जास्तीत जास्त छायाचित्रे पोस्ट करायला हवीत. (“Oh no I have to match my feed oh this oh that :-/”)
त्याच्या कमेंटवरुन खुशीने लिहिले “Shut it Ibrahim”. तिच्या या कमेंटमुळे इब्राहिम नाराज झाला. त्यावर इब्राहिमने लिहिले, “Wtf”… “Now you see”… “Bye”… खुशीसुद्धा उत्तर देण्यात मागे नव्हती. तिने लिहिले, “:’D :’D :’D :’D Ibrahim”
एकंदरीतच काय तर आता या दोघांचे भांडण सोडवायला श्रीदेवी आणि सैफलाच पुढाकार घ्यावा लागेल असे दिसतेय..
पुढे पाहा, खुशीच्या कोणत्या छायाचित्रांवर इब्राहिमने कमेंट केले होते...