आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'च्या शूटिंगवेळी फक्त 18 दिवसांची होती ही चिमुकली, आता झालीये एवढी मोठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी लाखो सिनेप्रेमी ‘बाहुबली 2’ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा 28 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि प्रेक्षकांना त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर गवसले. सिनेमाने जमवलेल्या रेकॉर्डब्रेक गल्ल्यावरुन प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची असेलली क्रेझ लक्षात येते. या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात पाचशे कोटींच्या घरात बिझनेस केला आहे. हा सिनेमा पडद्यावर बघणे जेवढे डोळे दिपवणारे आहेत, जेवढ्याच या सिनेमाच्या पडद्यामागील घडामोडीसुद्धा रंजक आहे. सिनेमाशी निगडीत अशीच एक रंजक गोष्ट आम्ही तुम्हाला येथे सांगतोय. तुम्हाला 2015 मध्ये रिलीज झालेल्या बाहुबलीचा पहिला भाग असलेल्या 'बाहुबली द बिगेनिंग' या सिनेमाचं पोस्टर आठवतंय का, ज्यामध्ये एक चिमुकलं बाळ दिसतंय. शिवगामी देवी हे बाळ पकडून पाण्यात उभी दिसतेयं. हे बाळ मुलगा नसून मुलगी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? होय, 'बेबी बाहुबली'च्या रुपात झळकलेले हे बाळ एक मुलगी आहे.
बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात झळकलेली ही चिमुकली कोण आहे , कशी झाली होती तिची निवड, वाचा पुढील स्लाईडवर...
-
शूटिंगच्या वेळी केवळ 18 दिवसांची होती ही चिमुकली... 
- 'बाहुबली'च्या पहिल्या भागात ही चिमुकली झळकली होती. या चिमुकलीचे नाव आहे अक्षिता. 
- आता ही चिमुकली अडीच वर्षांची झाली आहे. केरळच्या निलेश्वरम येथे ही वास्तव्याला आहे.   
- अक्षिताचे वडील वाल्सन हे 'बाहुबली' या सिनेमाचे प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह आहेत. 
- बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली आणि आर्ट डायरेक्टर साबू सायरिल हे या महत्त्वाच्या दृश्यासाठी एका छोट्या बाळाच्या शोधात होते. त्यांनी वाल्सन आणि त्यांच्या पत्नीला विनंती करुन अक्षिताची या भूमिकेसाठी निवड केली.
- त्यावेळी अक्षिता फक्त 18 दिवसांची होती. पाच दिवस या सीनचे शूटिंग चालले. 
- अक्षिता झळकत असलेले 'बाहुबली'चे पहिले पोस्टर रिलीज करुन राजामौली यांनी ट्विट केले होते,  "He has to fulfil his destiny, come what may!!!"
 
पुढे वाचा, बाहुबलीच्या पहिल्या भागात अभिनेत्री राम्या कृष्णन आणि चिमुकल्या अक्षितावर कुठे चित्रीत झाला होता हा सीन आणि कसा होता राम्याचा चित्रीकरणाचा अनुभव...  
बातम्या आणखी आहेत...