आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत पतिपासून विभक्त होऊनही कंगाल झाले नाही, या अॅक्ट्रेसने दिले स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अली पुंजानीसोबत किम शर्मा - Divya Marathi
पती अली पुंजानीसोबत किम शर्मा
अशी बातमी होती की, 'मोहब्बते' फेम बॉलीवुड अॅक्ट्रेस किम शर्माला तिचा बिझनेसमन पती अली पुंजानीने सोडले आहे आणि ती दुस-या कुणाला तरी डेट करत आहे. यासोबतच अशा बातम्याही आल्या होत्या की, ती आता कंगाली झाली आहे आणि फायनेंशियल प्रॉब्लममुळे मुंबईमध्ये जॉब शोधत आहे. परंतु किमने या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली की हे सर्व चुकीचे आहे. टि्विट करुन तिने फायनेंशियल प्रॉब्लमच्या बातम्यांवर निशाना साधला आहे...

किमने आपला फोटो टि्विटरवर शेयर करुन लिहिले आहे की, "तुम्ही थालँडमध्ये कोल्डप्ले म्यूझिक अटेंड करुन विकेंड साजरा करता आणि तेथून आल्यावर असे कळते की, तुम्ही कंगाल आहात अशा बातम्या व्हायरल होत आहे. अशा पुरावा नसलेल्या बातम्या छापण्यापुर्वी माझ्या तोंडून ऐका की, असे काहीच नाही." किमने या टि्विसोबत इनडायरेक्टली सांगितले आहे की, तिला कोणतीच फायनेंशियल प्रॉब्लम नाही. या सर्व बातम्या अफवा आहेत.
 
या कारणामुळे समोर आल्या होत्या तंगीच्या बातम्या
अलीसोबत लग्न केल्यानंतर किमने आपले बॉलीवुड करियर सोडले होते. आलेल्या माहितीनुसार ती पतिच्या बिझनेसमध्ये मदत करत होती. पती अली हा केन्यामध्ये हॉटेलच्या चेनचा मालक आहे. लग्नानंतर किम या हॉटेलची सीईओ बनली होती. परंतु घटस्फोटानंतर तिने ही पोस्ट सोडली होती. यामुळेच असे म्हटले जात होते की, पतिपासून वेगळी झाल्यानंतर किम कंगाल झाली आहे आणि मुंबईमध्ये जॉब शोधत आहे.
 
मुंबईच्या फॅशन डिझायनरसोबत जोडले किमचे नाव
किम मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिचे नाव फॅशन डिझायनर अर्जुन खन्नासोबत जोडले गेले. हे दोघं अनेकवेळा सोबत दिसले आहेत. येवढेच नाही तर किमने 21 जानेवारीला आपला बर्थडे गोव्यामध्ये अर्जुनसोबत सेलिब्रेट केला होता. विशेष म्हणजे अर्जुन खन्ना हा विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव शेफाली आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोण आहे किम शर्माचा पति अली पुंजानी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला
असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...