आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv:किशोर दांनी नाव बदलून केली होती करिअरला सुरुवात, या सेलिब्रिटींनीही केले स्वतःचे बारशे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत अभिनेतेे-गायक किशोर कुमार - Divya Marathi
दिवंगत अभिनेतेे-गायक किशोर कुमार
अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी आपले नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच नावांपैकी एक नाव म्हणजे किशोर कुमार. किशोर दांची 4 ऑगस्ट रोजी 86वी जयंती होती. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला होता. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली असे होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलून किशोर कुमार ठेवले. कोरस सिंगरच्या रुपात त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे अभिनयातसुद्धा त्यांनी आपले नशीब आजमावले होते.
अशोक कुमार होते मोठे भाऊ...
चार बहिणभावंडांमध्ये किशोर दा सर्वात लहान होते. किशोर दा लहान असतानाच अशोक कुमार बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते बनले होते. त्यांना पाहून त्यांचे छोटे भाऊ अनूप कुमार आणि किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता.
चार वेळा अडकले लग्नबंधनात...
किशोर कुमार यांनी आपल्या आयुष्यात चार वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा घोषसोबत झाले होते. हे लग्न 1950 ते 1958 पर्यंत टिकले. दोघांचा एक मुलगा आहे. त्यांचे दुसरे लग्न हे अभिनेत्री मधुबालासोबत झाले होते. या लग्नाचा शेवट 23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबालाच्या निधनामुळे झाला. किशोर दांनी तिसरे लग्न थाटले ते अभिनेत्री योगिता बालीसोबत. 1976 मध्ये झालेले हे लग्न 1978 रोजी किशोर दांच्या वाढदिवशीच तुटले. त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी लीना चंद्रावरकरसोबत लग्न केले. किशोर कुमार यांचे निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाले.
किशोर दांची गाजलेली गाणी...
किशोर दांनी अनेक गाणी आजही सदाबहार आहेत. यामध्ये 'मेरे सपनों की रानी', 'ये जो मोहब्बत है', 'कुछ तो लोग कहेंगे', 'ईना-मीना-डीका', 'फूलों के रंग से जाने जां ढूंढता फिर रहा', 'रूप तेरा मस्ताना'... या प्रमुख गाण्यांचा समावेश आहे.

बॉलिवूडमध्ये किशोर कुमार यांच्यापासून ते गोविंदा, अजय देवगण, अक्षय कुमार, प्रिती झिंटासह अनेक अशा अनेक अभिनेता-अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी आपले नाव बदलले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही स्टार्सविषयी सांगतोय ज्यापैकी काहींनी आपले नाव तर काहींनी आडनाव बदलले आहे.