आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : ही अभिनेत्री आहे अभिनेता फरदीन खानची सासू, एकेकाळी केलंय बी ग्रेड सिनेमांमध्ये काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - अभिनेत्री मुमताज, मुली आणि पतीसोबत, उजवीकडे - मुमताज यांची लेक नताशा फरदीन खानसोबत) - Divya Marathi
(डावीकडे - अभिनेत्री मुमताज, मुली आणि पतीसोबत, उजवीकडे - मुमताज यांची लेक नताशा फरदीन खानसोबत)
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस आहे. 60 आणि 70 च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणा-या मुमताज यांचा एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईनपर्यंत प्रवास कसा झाला जाणून घेऊयात...

एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात...
31 जुलै 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या मुमताज यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या हिंदी सिनेमांमधये एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्टच्या रुपात झळकल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही, म्हणून लो बजेट आणि बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांना काम करावे लागले.
राजेश खन्ना ठरले लकी चार्म...
1965 हे वर्ष मुमताज यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी मुमताज यांचा 'ऐ मेरे सनम' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या नकारात्मक भूमिकेमुळे मुमताजच्या आयुष्यात सर्वकाही सकारात्मक होऊ लागले. बी ग्रेड सिनेमांमधली हिरोईनला आता ए ग्रेड सिनेमे मिळू लागले होते. 'पत्थर के सनम', 'राम और श्याम' आणि 'ब्रम्हचारी' या सिनेमांमध्ये त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 1968 साली राज खोसला यांचा 'दो रास्ते' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील हीरो होते सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांच्या प्रेयसीच्या भूमिका मुमताज यांनी वठवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि मुमताज एका रात्रीत बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या. या सिनेमाबरोबर मुमताजच्या यशाचा काळ सुरु झाला.
यानंतर मुमताजे यांनी वळून बघितले नाही. 'आदमी और इन्सान', 'परदेसी', 'सच्चा-झुठा' या सिनेमांमुळे त्यांची गणती बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. 1970 साली रिलीज झालेल्या 'खिलौना' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मुमताज यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमे दिले. अधिकाधिक सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. के. बालाचंदर दिग्दर्शित आणि 1974 मध्ये रिलीज झालेल्या 'आईना' या सिनेमात मुमताजच्या अभिनयाचा वेगळा पैलू बघायला मिळाला. समीक्षक आणि स्वतः मुमताज या सिनेमातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनय समजते.
पडद्यावर परिधान केली बिकिनी
फिरोज खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अपराध', 'इंटरनॅशनल गँग', 'कॉनमॅन' या क्राईमवर आधारित सिनेमांमध्ये मुमताज यांनी खूप बोल्ड सीन दिले होते.या सिनेमांमध्ये त्यांनी टू पीस बिकिनी परिधान करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. मुमताज यांच्यावर चित्रीत झालेले 'हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवाने है...' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.

1974 मध्ये अडकल्या लग्नगाठीत, फरदीन खान आहे जावई
यशोशिखरावर असताना 1974 मध्ये मुमताज पोरबंदरचे व्यावसायिक मयुर माधवाणी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. 1974 मध्ये लग्नगाठीत अडकल्यानंतर आपले प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण होईपर्यंत म्हणजे 1976 पर्यंत हिंदी सिनेमांमध्ये काम केले. सध्या मुमताज युगांडामध्ये वास्तव्याला आहे. त्यांना दोन मुलगी असून नताशा आणि तन्या ही त्यांची नावे आहेत. दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान हा त्यांचा जावई आहे. मुमताज यांची थोरली मुलगा नताशा त्याची बालमैत्रीण असून तिच्यासोबत त्याचे लग्न झाले आहे. नताशा आणि फरदीनला एक मुलगी आहे.
2012 मध्ये भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुमताज यांना इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीच्या वतीने सेकंड मोस्ट पॉप्युलर ब्युटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एक नजर टाकुया, मुमताज यांच्या खास छायाचित्रांवर...