आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अक्षयची धाकटी बहीण, वयाच्या चाळिशीत 15 वर्षांनी मोठ्या बिल्डरच्या पडली होती प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेमकथा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या तो रजनीकांतसोबत '2.0' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अक्षय इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. वर्षाला त्याचे चार ते पाच सिनेमे रिलीज होत असतात. याउलट अक्षयची धाकटी बहीण अलका भाटिया मात्र लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. 

वयाच्या चाळिशीत अलकाने केले लग्न...
- अक्षयची बहीण अलका 2012 साली तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती.
- अलकाने वयाच्या 40 व्या वर्षी तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या बिझनेसमनसोबत प्रेमविवाह केला होता. सुरेंद्र हीरानंदानी हे अलकाच्या पतीचे नाव असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे.
- हीरानंदानी कन्स्ट्रक्शन कंपनी या ग्रुपचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. बरीच वर्षे अलका आणि सुरेंद्र यांचे अफेअर होते. लग्नानंतर हे कपल हनीमूनसाठी टर्की येथे गेले होते.
- अलका एक निर्माती असून तिने 'फुगली' हा सिनेमा प्रोड्युस केला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. 
- अलकासोबत लग्न करण्यासाठी सुरेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. पहिल्या लग्नापासून सुरेंद्र यांना नेहा ही एक मुलगी असून ती विवाहित आहे. तर सुरेंद्र यांची पहिली पत्नी प्रीती यांनीही त्यांचे जुने मित्र मिलन मेहतासोबत दुसरे लग्न केले.

अलकाच्या लग्नाच्या निर्णयामुळे नाखुश होता अक्षय..
- बहिणीच्या घटस्फोटित व्यक्तीसोबत लग्नाच्या निर्णयामुळे अक्षय कुमार नाखुश होता.
- दोघांच्या वयातील तब्बल 15 वर्षांचे अंतर हेसुद्धा अक्षयच्या नाखुशीचे आणखी एक कारण होते. 
- सुरेंद्र यांचे अलकासोबतचे दुसरे लग्न आहे.
- सुरेंद्र यांनी 2011 साली पहिली पत्नी प्रीतीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर वर्षभराने अलका भाटियासोबत दुसरे लग्न थाटले.
- अखेर अक्षयला बहिणीच्या हट्टापुढे हार मानावी लागली आणि संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नात सहभागी झाले होते.  

रक्षाबंधनाच्या दिवशी व्हायरल झाला होता अक्षय-अलकाचा व्हिडिओ...
- गेल्यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अलका आणि अक्षयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.  
- या व्हिडिओत अलका अक्षयला मारताना दिसतेय. तर अक्षय रावण झालेला दिसतोय.  
- हा एक फनी व्हिडिओ होता. जो अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. 

 पुढील स्लाईड्सवर बघा, अक्षयची बहीण अलकाचे 11 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...