आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड स्टार्सही म्हणतात \'तेरे जैसा यार कहा...\', वाचा त्यांच्या निखळ मैत्रीची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: आलिया भट्ट आणि सलमान खान)
मुंबई: जगात अनेक प्रकारची नाती असतात. परंतु त्यात मैत्रीचे नाते सर्वात अनोखे आणि आपलेपणाची भावना जागवणारे असते. त्याची प्रत्येक तार आपल्या मनाशी जोडलेली असते. सर्वांप्रमाणे बॉलिवूड स्टार्सचेही काही खास मित्र-मैत्रीणी आहे. त्यांच्यासह ते वेळ काढून धमाल-मस्ती करणे पसंत करतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्त DivyaBhaskar.Com तुम्हाला काही स्टार्स आणि त्याच्या मित्राची माहिती घेऊन आले आहे. जाणून घ्या कोणत्या व्यक्तीला हे बी-टाऊनचे स्टार्स मानतात सर्वात खास मित्र...
माझा प्रिय मित्र आहे अक्षय कुमार- प्रियांका चोप्रा
'माझी मते मैत्री म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण विश्वास करू शकतो. आपली प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करू शकतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे, ती व्यक्ती आपल्याला नेहमी चांगला सल्ला देते. हे सर्व गुण अक्षय कुमारमध्ये मला दिसतात. अक्षय फटकळ बोलणारी व्यक्ती आणि स्वच्छ मनाचादेखील आहे. माझी त्याच्याशी खूप चांगली मैत्री आहे. मला आजही आठवते, जेव्हा माझ्या वडीलांचे निधन झाले होते, तेव्हा मी खचून गेले होते, त्यावेळी अक्षयने मला सावरले. तो नेहमी माझी काळजी घेतो. एकेकाळी माझ्या आणि अक्षयच्या मैत्रीला रोमान्सचे नाव देण्यात आले होते. मात्र आमच्या खूप चांगली मैत्री आहे. मला जेव्हा कधी कोणत्या गोष्टीत सल्ला हवा असल्यास मी त्याच्याकडून घेते. जेव्हा-जेव्हा मी अक्षयसोबत सिनेमे केले आहेत, तेव्हा तेव्हा तो मला शाळेतील शिक्षकाप्रमाणे ओरडून योग्य मार्गदर्शन करतो. शिस्त पाळणे मी त्याच्याकडून शिकले. अक्षय माझ्या अशा मित्रांपैकी एक आहेस, जे माझे शुभचिंतक आहे. म्हणून मी त्याच्या कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटून घेत नाही. कारण तो जे बोलतो ते माझ्यासाठी योग्य असते.'
धोनी, अभिषेक आणि अक्षयसोबत चांगली मैत्री- जॉन अब्राहम
महेंद्र सिंह धोनी आणि माझी मैत्री आमची ओळख निर्माण होण्यापूर्वीपासूनच होती. सामान्य तरुणांप्रमाणे आम्हालाही मोटरबाईक आणि फुटबॉलशी प्रेम होते. आजही आमच्यात पूर्वीप्रमाणेच मैत्री आहे. आज माझ्याकडे दोन बाईक आहेत. तसेच महेंद्रकडे 29 बाईक आहेत. पूर्वी आमची भेट दररोज व्हायची, परंतु आता कधी-कधी होते. मात्र मॅसेज आणि फोनवरून आम्ही संपर्कात राहतो. त्याच्या आयुष्यात काही नवीन घडले तर तो मला सांगतो, आणि माझ्या आयुष्यातील खास गोष्टी मी त्याच्याशी शेअर करत असतो. मित्रांनी रोज भेटावे हे गरजेचे नाहीये, परंतु भेटले तर नवीन जोश घेऊन भेटावे. धोनीशिवाय अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनसुध्दा माझे चांगले मित्र आहेत. धोनीप्रमाणेच अभिषेकलासुध्दा बाईक चालवायचा शौक आहे. 'धूम'च्या शूटिंगदरम्यान तो नेहमी माझी बाईक घेऊन जायचा. अक्षयविषयी सांगायचे झाले तर विनोदी आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीत एकतरी विनोद दडलेला असतो. त्यामुळे मला त्याची कंपनी आवडते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर स्टार्स कोणाला मानतात आपला चांगला मित्र...