प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची गोड बातमी आम्ही तुम्हाला दिली आहे. निवेदिता पोहनकर हे त्यांच्या होणा-या पत्नीचे नाव आहे. मकरंद देशपांडे यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. रंगभूमीवर रमणा-या मकरंद यांनी हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. अलीकडेच त्यांचा दगडी चाळ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुकदेखील झाले.
6 मार्च 1966 रोजी जन्मलेल्या मकरंद यांनी वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र अद्याप ते अविवाहितच आहेत. मात्र दोन नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यापैकी एक म्हणजे शशी कपूर यांची कन्या संजना कपूर आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे दिल चाहता है फेम सोनाली कुलकर्णी. सोनालीसोबत तर मकरंद जवळजवळ चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. या दोघांचे प्रेम संबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांनी प्रोफेशनल रिलेशन मात्र जपले.
आता वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत असताना मकरंद यांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार गवसला आहे. निवेदिता हे तिचे नाव आहे. मात्र निवेदिता कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय... याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?
चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय निवेदिता पोहनकर हिच्याविषयी...