आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ ईशा-अहाना नाही तर धर्मेंद्र यांना आहेत अजून दोन मुली, हे आहेत त्यांच्या कुटुंबाचे Rare फोटोज्..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल 'पल पल दिल के पास' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. बॉबी आणि सनी हे दोघेही मुले तरुण असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर विवाह केला होता.
 
4 डिसेंबर 1935मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये 'अ‍ॅक्शन किंग' आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाते. धर्मेंद्र यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी 'शोले' या सिनेमात साकारलेली वीरुची भूमिका आजही प्रेक्षकां च्या स्मरणात आहेत. आपल्या दमदार अभिनयाने धर्मेंद्र यानी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवलेल्या धर्मेंद्र यांच्या कुटुंबाविषयी आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. 
 
19 व्या वर्षी झाले पहिले लग्न..
 
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना एकुण चार मुले असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. धर्मेंद्र यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुले आणि दोन मुली आहेत. सनी, बॉबी, अजीता आणि विजेता ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.
 
 
चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुली..
 
सनी आणि बॉबी यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर अजीता आणि विजेता फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहिल्या आणि कॅलिफोर्नियात सेटल झाल्या.
 
धर्मपरिवर्तन करुन केले दुसरे लग्न..
 
अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे धर्मेंद्र नेहमीच चर्चेत राहिले. पहिले लग्न झाले असतानादेखील धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीबरोबर आपला दुसरा संसार थाटला. दोघांनी 2 मे 1980मध्ये लग्न केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली असून ईशा आणि अहाना ही त्यांची नावे आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...