आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बींच्या लग्नात होते केवळ 5 व-हाडी, अतिशय घाईत उरकले होते लग्न, वाचा लग्नाचा किस्सा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेस करणार आहेत. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे. मात्र त्यांचे लग्न नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाले होते, याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. अगदी दोन दिवसांत बिग बी आणि जया यांचे लग्न ठरले होते. लग्नात बिग बींकडून वरातीत केवळ पाच लोक सहभागी झाले होते. जाणून घ्या अमिताभ-जया यांच्या लग्नाचा किस्सा...
अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट
जया बच्चन जेव्हा पुण्यात शिक्षण घेत होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या 'सात हिंदुस्थानी' (1969) या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने पुण्यात आले होते. जया त्यांना ओळखत होती. त्याकाळात जया आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती.
अमिताभ यांच्यावर जडला जीव
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'गुड्डी' या सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि जया यांना कास्ट केले होते. मात्र काही कारणास्तव अमिताभ यांना या सिनेमातून बाहेर करण्यात आले. फिल्म इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात, की या घटनेनंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याविषयी प्रेम निर्माण झाले होते.
गुपचुप थाटले होते लग्न
'जंजीर' हिट झाल्यानंतर परदेशात फिरायला जायचे, हे अमिताभने जयाला सांगून ठेवले होते. पण हरिवंशराय बच्चन यांनी सांगितले, की परदेशात जायचे तर आधी लग्न करा. जून 1973 ची ही घटना. त्यावेळी अमिताभ तीस वर्षांचा होते. अखेर दोन दिवसांची नोटीस देऊन लग्न उरकरण्यात आले. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी अमिताभ तीन आठवड्यांसाठी लंडनला गेले. अगदी साध्या समारंभात अमिताभ आणि जया लग्नगाठीत अडकले. घाईतच दोघांचे लग्न उरकले होते.
लग्नात केवळ पाच व-हाडी...
अमिताभ बच्चन यांच्या वरातीत वडिलांसह केवळ पाच लोक सहभागी झाले होते. यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतून केवळ गुलजार साहेब होते. तर वधू जयाच्या बाजुने आईवडील आणि बहिणीसोबत अभिनेते असरानी आणि अभिनेत्री फरीदा जलाल सहभागी झाल्या होत्या. लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आमंत्रित करण्यात आले होते.
राजेश खन्ना यांना नापसंत होते जय-अमिताभ यांचे नाते
सुपरस्टार राजेश खन्ना जया बच्चन यांचे जवळचे मित्र होते. त्यांना जया आणि अमिताभ बच्चन यांचे नाते पसंत नव्हते. राजेश खन्ना यांनी अनेकदा जया यांना सांगितले होते, की अमिताभ यांना भेटू नकोस. असे सांगितले जाते, की अमिताभ जया यांनी भेटण्यासाठी 'बावर्ची' सिनेमाच्या सेटवर जात होते, तेव्हा राजेश खन्ना त्यांना दुर्लक्षित करत होते.
शोलेच्या शूटिंगनंतर पहिल्यांदा आई झाल्या जया...
लग्नानंतर जया बच्चन फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव होत्या. शोले च्या शूटिंगवेळी जया बच्चन पहिल्यांदा गर्भवती होत्या. सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांची थोरली मुलगी जयाचा जन्म झाला. तर मुलगा अभिषेकच्या जन्मानंतर जया बच्चन यांनी काम कमी केले होते.

80च्या दशकात सिनेमात काम करणे केले कमी
80च्या दशकात कौटुंबिक जबाबदा-या सांभाळण्यासाठी जया बच्चन यांनी काम कमी केले. 1981 मध्ये 'सिलसिला' हा सिनेमा केल्यानंतर त्या बॉलिवूडपासून दूर झाल्या. या सिनेमात जया यांच्यासह अमिताभ आणि रेखा झळकले होते.

17 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये केले कमबॅक
1981 मध्ये सिलसिलानंतर बॉलिवूडपासून दूर गेलेल्या जया यांनी 1998मध्ये 'हजार चौरासी की मां' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या सिनेमानंतर त्या ब-याच सिनेमात झळकल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जया आणि अमिताभ यांच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...