आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At The Age Of 8 Randhir Kapoor Debut In Bollywood, Know About Other Family Members

कपूर घराणे : पृथ्वीराजपासून ते रणबीरपर्यंत, जाणून घ्या कुणी कोणत्या वर्षी इंडस्ट्रीत केले डेब्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील पहिले आणि मोठे घराणे आहे. याचे कारण म्हणजे भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचल्यापासून कपूर घराण्यातील लोक सिनेसृष्टीत कार्यरत आहे. रणधीर यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 'श्री 420' (1955) आणि 'दो उस्ताद' (1959) सह काही सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. रणधीर यांच्याप्रमाणेच या कुटुंबातील अनेकांनी अगदी लहान वयातच सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. हे आहेत ते सदस्य...
रणधीर कपूर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1947 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी हीरो म्हणून 'कल आज और कल' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर त्यांनी 'जीत', 'रामपुर का लक्ष्मण', 'जवानी-दीवानी', 'हमराही', 'चाचा-भतीजा', 'हाथ की सफाई', 'दिल दीवाना'सह अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र सिनेसृष्टीत फार लांबचा पल्ला ते गाठू शकले नाहीत. त्यांचे लग्न अभिनेत्री बबितासोबत झाले. त्यांना करिश्मा आणि करीना या दोन मुली आहेत.
करिश्मा कपूर
रणधीर कपूर यांची कन्या करिश्मा कपूरने वयाच्या 17 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1991 मध्ये आलेला 'प्रेम कैदी' हा तिचा पहिला सिनेमा होता.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा कपूर घराण्यातील कोणत्या सदस्याने वयाच्या कोणत्या वर्षी फिल्मी प्रवासाला सुरुवात केली...