आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know More About ‘Welcome Back’ Actress Ankita Srivastava

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

In Pics : कोण आहे \'वेलकम बॅक\'मधली ही ग्लॅमरस राजकुमारी, जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा 'वेलकम बॅक' हा सिनेमा रिलीज झाला. नाना पाटेकर, अनिल कपूर, डिंपल कपाडिया, नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, श्रुती हासन या ओळखीच्या चेह-यांमध्ये एक नवीन चेहरा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसला. राजकुमारी चाँदनीच्या भूमिकेत दिसलेला नवोदित चेहरा कोण? हा प्रश्न अनेकांना पडला. चला तर मग ही ग्लॅमरस तरुणी आहे तरी कोण जाणून घेऊयात...
'वेलकम बॅक'मध्ये अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सतत प्रेक्षकांना दिसलेल्या राजकुमारी चाँदनीचे खरे नाव आहे अंकिता श्रीवास्तव. मुळची लखनऊची असलेल्या अंकिताचा 'वेलकम बॅक' हा पहिलाच सिनेमा आहे. लखनऊमध्ये जन्मलेली आणि मुंबईत लहानाची मोठी झालेल्या अंकिताच्या आईची इच्छा होती, की तिने सिनेसृष्टीत काम करावे. काही जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिला 'वेलकम बॅक' हा सिनेमा मिळाला.
अंकिताला कसा मिळाला चाँदनीचा रोल?
अंकिता श्रीवास्तव अभिनेत्री श्रीदेवीची मोठी चाहती आहे. तिला श्रीदेवीचा चाँदनी हा रोल खूप भावला आहे. 'वेलकम बॅक'च्या ऑडिशनवेळी अंकिताने दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माता फिरोज नाडियाडवालासमोर श्रीदेवीने साकारलेल्या चाँदनीचा रोल सादर केला. दोघांनाही अंकिताचा परफॉर्मन्स खूप भावला आणि तिला नजफगडच्या राजकुमारी चाँदनीचा रोल मिळाला. विशेष म्हणजे, अंकिताला सिनेमात चाँदनी हेच नाव देण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ग्लॅमरस अंकिताची खास छायाचित्रे...