आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असीनला नाही लग्नाची घाई, मे 2016 मध्ये होऊ शकते लग्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : असिन आणि मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा - Divya Marathi
फाइल फोटो : असिन आणि मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा

एन्टरटेन्मेंट डेस्कः मीडियात सुरु असलेल्या चर्चेनुसार अभिनेत्री असीन थोट्टूमकल लग्न करणार आहे. 'ऑल इज वेल' या सिनेमाच्या रिलीजनंतर असीन लग्नाची अधिकृतरित्या घोषणा करणार असल्याचेही म्हटले जात आहे. असीनने अद्याप या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी मे महिन्यात ती लग्न करणार आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, असीनच्या जवळच्या सूत्राच्या मते, असीनला लग्नाची मुळीच घाई नाहीये. लग्न पुढील वर्षी किंवा दोन वर्षांनीसुद्धा होऊ शकते.
नवीन प्रोजेक्ट्स नाकारतेय असीन
नवी ऑफर्स न स्वीकारण्याचे कारण सांगताना असीन म्हणाली, "मी सध्या आपले हातात असलेले काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. पुढील दोन वर्षे मी नवीन प्रोजेक्ट्स स्वीकार नाहीये."

असीनने आमिर खान स्टारर 'गजनी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 29 वर्षीय अशीन यापूर्वी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने बॉलिवूडमध्ये गजनीव्यतिरिक्त 'लंडन ड्रीम्स', 'बोल बच्चन', 'हाऊसफूल 2' या सिनेमांमध्ये काम केले आहे.
अक्षयने केली आहे राहुल आणि असीनच्या लग्नात मध्यस्थी
असे म्हटले जाते, की अभिनेता अक्षय कुमार असीन आणि राहुल शर्मांच्या लग्नात मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. राहुल आणि अक्षय खूप चांगले मित्र असून अक्षयच्या माध्यमातूनच त्यांची असीनसोबत भेट झाली होती. 36 वर्षीय राहुल मायक्रोमॅक्सचे को-फाऊंडर आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अलीकडच्या काळात असीनने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली तिची छायाचित्रे... असीनच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही सर्व छायाचित्रे साभार घेण्यात आली आहेत.