मुंबई- बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना लवकरच वयाची 70 वर्षे पूर्ण करणार आहेत. 6 ऑक्टोबर 1946ला पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये. मध्यमवर्गीय कुटुंबातील विनोद बॉलिवूड अभिनेता होण्यापासून ओशो यांच्याशी प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत ते चर्चेत राहिले. विनोद ओशोंच्या चरणी जवळपास 4 वर्षे माळी म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. पुण्यातील ओशो आश्रमात काही वर्षे राहिले. येथूनच ते आचार्य रजनीश ओशो यांच्यासोबत अमेरिकेत निघून गेले आणि त्यांच्या खासगी बगिच्यात माळीचे काम केले. येथे त्यांनी त्यांचे टॉयलेट स्वच्छ करण्यापासून ते खटकडी भांडीसुद्धा घासली होती.
लोक म्हणायचे 'सेक्सी संन्यासी'
- एकेकाळी विनोद कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते.
- असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी
आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले.
- विनोद पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जात होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले.
- डिसेंबर 1957मध्ये विनोद यांनी सिनेमांपासून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
- त्यांना 'सेक्सी सन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद अमेरिकेला निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्षे घालवले. तिथे त्यांनी माळीचे काम केले.
सर्वकाही केले दान...
- पुण्यातील ओशो आश्रमात त्यांना 31 डिसेंबर 1975 रोजी दीक्षा दिली गेली होती.
- ओशो आश्रमाशी जुळण्यापूर्वीपर्यंत विनोद खन्ना बॉलिवूडमधील आघाडीच्या तीन अभिनेत्यांपैकी एक होते.
- ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर विनोद खन्ना यांनी आपले शेकडो जोडी सुट, कपडे, बुट आणि इतर लग्झरी साहित्य लोकांमध्ये वाटून टाकले होते.
- आश्रमात ते केवळ भगवे किंवा मरुन कलरचे कपडे घालत होते.
- अमेरिकेत ओशो आश्रमात राहत असताना त्यांनी माळीचे काम केले. होते. मात्र अमेरिकेतील आश्रम बंद पडल्यानंतर ते भारतात परतले होते.
- एका मुलाखतीत विनोद यांनी स्वतः अमेरिकेतील आश्रमात माळीपासून ते स्वीपरचे काम केल्याचे कबुल केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ओशोंशी प्रभावित झालेल्या विनोद खन्ना यांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)