आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्सपासून ते अवैध शस्त्रांपर्यंत, असा आहे 'मुन्नाभाई'चा जीवनप्रवास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- संजय दत्त) - Divya Marathi
(फाइल फोटो- संजय दत्त)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली सध्या येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. संजय दत्त येत्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जेलमधून कायमचा सुटणार आहे. 25 फेब्रुवारीदरम्यान संजय दत्तची जेलमधून सुटका होणार असल्याची माहिती येरवडा कारागृहातील सूत्रांनी दिली आहे. चांगल्या वर्तणूकीमुळे संजयला 105 दिवस आधी जेलमधून घरी सोडणार असल्याचे कळते. नियमानुसार संजय दत्तची शिक्षा 7 मार्चला संपत आहे. मात्र, जेल अधिक्षक त्याची शिक्षा 10 दिवसांनी कमी करणार असल्याचे कळते.
तसे पाहता, संजय दत्त कोणत्या ना कोण्त्या कारणांमुळे नेहमीच वादात अडकला आहे. कधी-कधी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका कलाकारांच्या आयुष्यात उतरतात. असेही काही सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा संजय दत्तसोबत झाले. संजयने अनेकदा पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाला डोक्यावर घेतले .
जेव्हा-जेव्हा संजय पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत आला तेव्हा-तेव्हा त्याच्या अभिनयासह सिनेमांचीदेखील प्रशंसा झाली. त्यात मग 'वास्तव'चा 'राघु' असो अथवा 'अग्निपथ'चा 'कांचा', संजयने पडद्यावर खलनायकाचा वेगळाच चेहरा समोर आणला. परंतु त्याचे खासगी आयुष्य अनेक चढ-उतार आणि उलट-सुलट गोष्टींने भरलेले आहे.
संजयच्या चुकींच्या सवयींमुळे अनेकदा सुनील दत्त यांना केवळ मान खाली घालावी लागली तसेच त्यांना कोर्टाची पायरीदेखील चढावी लागली. कधी संजयचे ड्रग्सच्या व्यसनामुळे तर कधी मुंबई बॉम्बस्फोटात नाव आल्याने, सुनील संजयमुळे अनेकदा पेचात अडकले. या रिपोर्टमधून आम्ही संजय दत्तशी निगडीत काही वादांवर प्रकाश टाकत आहोत, ज्यामुळे दत्त कुटुंब अनेकदा अडचणीत अडकले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कुणी लावला होता असा आरोप, की बाळासाहेब ठाकरेंकडे संजय दत्तला वाचवण्यासाठी सुनील यांनी मागितली होती आणि का नर्गिस यांनी नम्रता दत्त यांनी दिली संयजची काळजी घेण्याची जबाबदारी...