आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuch Kuch Hota Hai Turns 17, Know About Unkown Facts About Film

'कुछ कुछ होता है' : पाहा 17 वर्षांनंतर कशी दिसते स्टारकास्ट, जाणून घ्या Unknown Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कुछ कुछ होता है' मधील सेलेब्स 17 वर्षांपूर्वी आणि आता... - Divya Marathi
'कुछ कुछ होता है' मधील सेलेब्स 17 वर्षांपूर्वी आणि आता...

16 ऑक्टोबर 1998 रोजी 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली आहे. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टारर हा सिनेमा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. या सिनेमाच्या रिलीजला 17 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खानने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत लिहिले,'' 17 yrs of KKHH.Thanks Karan, Santosh, Jatin-Lalit, Salman, Faridaji, Anupam, Johnny Sana, Kajol, Rani & all. Beautiful memories.''
या सिनेमातील कॅम्पस, त्यातले प्राध्यापक, प्राध्यापिकेचा स्कर्ट, वर्गातले विनोद, ती मुलामुलींची मैत्री, त्यांच्या पार्ट्या, सगळेच भन्नाट होते. या सिनेमाने आणि त्यातल्या कॅम्पसने त्यावेळच्या तरुण पिढीला वेड लावले होते.
करण जोहर दिग्दर्शित हा सिनेमा यूकेच्या टॉप टेन बॉलिवूड सिनेमांमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा ठरला. 'हम आपके है कौन' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा ठरला होता. या सिनेमाचे संगीतही प्रचंड गाडले होते. इतकेच नाही तर तब्बल आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा एकमेव सिनेमा आहे. करण जोहरचा हा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. आदित्य चोप्राला असिस्ट केल्यानंतर त्याने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमामुळे शाहरुख-काजोल ही जोडी प्रसिद्धीझोतात आली होती. त्यामुळे या दोघांनाच आपल्या पहिल्या सिनेमात कास्ट करण्याचे करणने ठरवले होते. तर राणी मुखर्जीने साकारलेली भूमिका सुरुवातील ट्विंकल खन्नाला ऑफर झाली होती. मात्र तिने नाकारल्यानंतर ही भूमिका राणीच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे स्क्रिप्ट न वाचताच राणीने या सिनेमासाठी आपला होकार कळवला होता.
या सिनेमात सलमान खानने गेस्ट अपिअरन्स दिला होता. सलमानच्या भूमिकेसाठीही सुरुवातीला सैफ अली खान आणि चंद्रचुड सिंग यांच्या नावांचा विचार झाला होता. मात्र दोघांनीही ही भूमिका नाकारली. त्यानंतर सलमानची वर्णी या सिनेमात लागली. 21 ऑक्टोबर 1997 रोजी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. साडे नऊ महिन्यांच्या कालावधीत या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण झाले होते. या सिनेमातील टायटल ट्रॅक हा स्कॉटलंडमध्ये शूट करण्यात आला होता. याच्या चित्रीकरणारा दहा दिवसांचा अवधी लागला होता. 'ये लडका है दिवाना' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान काजोलला गंभीर दुखापत झाली होती. या सिनेमात सना सईद परजान दस्तूर या दोन बालकलाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
चला जाणून घेऊयात, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 17 वर्षांनंतर काय करत आहे आणि सिनेमाशी निगडीत काही इंट्रेस्टिंग गोष्टी..