आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाल कपूरपासून ते आयुष शर्मापर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे 16 Famous जावई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः खास लूक्स आणि अभिनयाच्या बळावर बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता कुणाल कपूरने नुकतीच वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत जन्मलेल्या कुणालचे फेब्रुवारी 2015 मध्ये अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चनसोबत लग्न झाले. एका मुलाखतीत कुणालने सांगितले होते, "आमच्या दोघांची पहिली भेट ही एका फॅशन शोमध्ये झाली होती. करण जोहरचा तो पहिला फॅशन शो होता. नैना तिथे तिची मोठी बहीण श्वेता नंदासोबत आली होती. तर मी तेथे रॅम्प वॉक केला होता."

गाणे ऐकले आणि प्रेमात पडले...
पहिल्या भेटीत कुणालवर इम्प्रेस झालेल्या नैनाने त्याचे 'रंग दे बसंती', 'लव शव ते चिकन खुराना', 'लम्हा' हे सिनेमे पाहिले. कुणालच्या सिनेमातील गाणी ऐकून ती त्याच्या प्रेमात पडली. नैना बच्चनने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सांगितले होते, "मी जेव्हा पहिल्यांदा कुणालला भेटले, तेव्हा त्याला बघून मी मनातल्या मनात वॉव, टॉल, डार्क अँड हॅण्डसम हे शब्द आलेत. मात्र नंतर भेटीतून उलगड गेले, की तो त्याच्या लूक्सपेक्षा खूप चांगली व्यक्ती आहे." विशेष म्हणजे नैना आणि कुणाल काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिलेत.

कुणाल कपूरसह असे अनेकजण आहेत, जे कपूर, खान, बच्चन या बड्या घराण्यांचे जावई आहेत. divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्यांच्या Son-in-Laws विषयी सांगत आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध Son-in-Laws विषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...