आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुल साइडपासून लिव्हिंग एरियापर्यंत, काइलीचा न्यू बंगला- पाहा, INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(काइली जेनरचा नवा बंगला.) - Divya Marathi
(काइली जेनरचा नवा बंगला.)
रियलिटी स्टार काइली जेनरने तीसरा बंगला हिडन हिल्स कॅलिफोर्नियामध्ये घेतला आहे. हा बंगला 5000 स्क्वेयर फूट एवढ्या मोठ्या परिसरात पसला आहे. याची किंमत साधारणपणे 30 कोटी रुपये एवढी आहे. या बंगल्यात भव्य पुल असून हा बंगला रँच थीमवर तयार करण्यात आला आहे. 

आणखी दोन बंगले आहेत काइली कडे....
नुकताच काइलीने एक नवीन बंगला खरेदी केला आहे, या बंगल्यातील लिव्हिंग रूम आणि पुल साइड अत्यंत आकर्षक आहे. यात चार बेडरूम आणि चार बाथरूम आहेत. काइली या बंगल्याचा ऑफीस म्हणून वापर करणार आहे. बंगल्याच्या खालच्या भागात हार्डवुड फ्लोरिंग आहे. बेडरुममध्ये फायर स्पेस, मोठमोठे काचेचे दरवाजे आणि खिडक्या आहेत. बाथरुममध्ये बाथटब, सिंक आणि शॉवरचीही व्यवस्था आहे. 2013 मध्ये तयार झालेल्या या बंगल्यात कार पार्किंगसाठी खास गॅरेजदेखील आहे. येथे एकाच वेळी चार कार पार्क केल्या जाऊ शकतात. या बंगल्यातील स्वयंपाक घरही अत्यंत आकर्षक आहे, बंगल्याच्या आउट साइडला पुलची व्यवस्था करण्यात आली आहे.

लॉस एंजिलिसमध्येही आहे एक बंगला
काइलीकडे 17 कोटी रुपचांपेक्षाही अधिक किमतीचा एक बंगला लॉस एंजिलिसमध्ये आहे. हा बंगलाही साधारणपणे 4900 स्क्वेयर फुट एवढ्या विस्तिर्ण जागेवर पसरलेला आहे. याशिवाय हिडन हिल्स येथेही तिच्या नावे एक 40 कोटी रुपयांचा बंगला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काइलीच्या नव्या बंगल्याचे NSIDE PHOTOS ...
बातम्या आणखी आहेत...