आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस घरात पडून होता मृतदेह, ललिता पवारसह हे 5 सेलेब्स अखेरच्या क्षणी होते एकटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
मुंबई - हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार झाले, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये स्टारडम, प्रसिद्ध, पैसा आणि मानसन्मान प्राप्त केला. मात्र अखेरच्या काळात ते अज्ञातवासात निघून गेले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. आज त्या हयात असत्या तर 101 वर्षांच्या असत्या. सिल्व्हर स्क्रिनवर खाष्ट सासू आणि शिस्तप्रिय आईची भूमिका जीवंत करणा-या ललिता पवार यांनी जवळजवळ सहाशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. 
 
1990 मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कॅन्सर झाला. उपचारासाठी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. कॅन्सरमुळे दिवसेंदिवस त्यांचे वजन कमी होत गेले आणि त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली. 26 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांच्या पतींनी त्यांना फोन केला, मात्र त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पुण्याच्या घरी दाखल झाले. येथे त्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टममध्ये उघड झाले, की 24 फेब्रुवारी रोजीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच पडून राहिला होता. त्यांच्या निधनाबद्दल कुणालाच कळू शकले नव्हते. आज ललिता पवार आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांमधून त्या नेहमीच जीवंत राहतील.

सुरुवातीच्या काळात यशाचे शिखर सर केल्यानंतर आयुष्याच्या अखेरच्या काळात अज्ञातवासात किंवा एकांतवासात राहिलेल्या अशाच काही कलाकारांविषयी divyamarathi.com आज तुम्हाला माहिती देणार आहे. त्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...