आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही तरुणी होणार जॅकी श्रॉफची सून? टायगरसोबत करतेय डेटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ)

जॅकी श्रॉफ यांचे सुपुत्र टायगर सध्या एका मॉडलसोबत डेट करत आहे. दिशा पटनी नावाच्या या मॉडलला अभिनेत्री बनायचे आहे. टायगरचा दुसरा चित्रपट "बागी'मध्ये त्याच्या नायिकेच्या भूमिकेसाठी दिशाची निवड करण्यात आली होती, परंतु आता श्रद्धा कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिशा आणि टायगरला अनेकदा वांद्रेच्या आसपास ड्राइव्ह करताना पाहायला मिळाले. दोघे एकाच जीममध्ये जात असून व्यायामही सोबतच करतात.
दोघेही सध्या आपले नाते जगासमोर आणू इच्छित नाहीत. त्यामुळेच ते लोकांसमोर एकत्र फिरत नाही किंवा सोशल मीडियावरही एकमेकांचे फोटो शेअर करत नाहीत. अहमद खान आणि आतिफ असलम यांचा व्हिडिओ "जिंदगी रहा हूं मैं...' मध्येच केवळ हे दोघे सोबत दिसतात.
कोण आहे दिशा पटनी...
दिशा इंदूरची रहिवासी असून २०१३ मध्ये पार पडलेल्या मिस इंदूर स्पर्धेची फर्स्ट रनर-अप राहिलेली आहे. दिशाने यापूर्वी तीन चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप यश मिळाले नाही. यामध्ये करण जोहरचा "नो सेक्स प्लीज', एकता कपूरचा "वॅनिटी फेयर', "वी आर इंडियन'चा समावेश आहे. याशिवाय 'मेन विल बी मेन' या जाहिरातीतसुद्धा दिशा झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिशाची खास छायाचित्रे...