आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा शाहरुखचा फक्त 'दिलवाले', काजोलसोबत झळकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः काजोल आणि शाहरुख खान)
शाहरुखने सोशल मीडियावर आपल्या एका चाहत्याला सांगितले, 'दिलवाले' यंदाची एकमेव रिलीज.

शाहरुख खान सध्या तीन चित्रपट करत आहे. मनीष शर्माचा "फॅन', रोहित शेट्टीचा "दिलवाले' आणि राहुल ढोलकियाचा "रईस'. शाहरुखसह वरुण धवन आणि कृती सेनन यांच्या भूमिका असलेला "दिलवाले' ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तसेच "फॅन' देखील याच वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा तर्कही लावला जात होता. वास्तविक आता हे स्पष्ट झाले आहे की, २०१५ मध्ये त्याचा केवळ एकच सिनेमा रिलीज होणार आहे.
"रईस' मनीष शर्माचा सिनेमाही पुढील वर्षीच येणार आहे. वास्तविक याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शाहरुखने ट्विटरवर चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केले. एकाने यंदाच्या रिलीजविषयी विचारले असता त्याचे उत्तर होते "दिलवाले'.