आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Launching Party Of New Marathi Serial Dil Dosti Duniyadari

\'दिल दोस्ती दुनियादारी\'ची थाटात झाली लाँचिंग पार्टी, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लाँचिंग पार्टीतील छायाचित्रे)
एका मैत्रीची आणि मित्रांची गोष्ट सांगणारा ‘दिल दोस्ती दुनियादारी’युथफुल मालिका सोमवारपासून झी मराठीवर दाखल झाली आहे. सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेची लाँचिंग पार्टी नुकतीच मुंबईत झाली.
या पार्टीत मालिकेच्या टीमसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार पार्टीत सहभागी झाले होते. संजय जाधव दिग्दर्शित या मालिकेत अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मालिकेच्या लाँचिग पार्टीत शुभांगी गोखले, सई ताम्हणकर, सुयश टिळक, हर्षदा खानविलकर, जितेंद्र जोशी यांच्यासह बरेच कलाकार पोहोचले होते.
'दिल दोस्ती दुनियादारी'ची कथा ही घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची आहे. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. काय आहेत त्यांची स्वप्नं ? आणि काय आहेत त्यांची आव्हाने? याची गोष्ट बघायला मिळणार आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लाँचिंग पार्टीची खास झलक...