दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे असंख्य चाहते आहेत. चाहत्यांच्या प्रेमामुळे ते फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत नावाने प्रसिद्ध झाले. रजनी यांनी अलीकडेच आपल्या फिल्मी करिअरची 41 वर्षे पूर्ण केली आहेत.
रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला असून त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांत आज सर्वाधिक श्रीमंत फिल्म स्टार आहे. मात्र त्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. बालपणीच त्यांच्यावरुन आईचे छत्र हरवले. त्यांनी आता वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. साठी ओलांडल्यानंतरही ते तरुणाला लाजवणारे स्टंट्स पडद्यावर करताना दिसतात.
रजनीकांत यांनी सिनेसृष्टीत 41 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असाव्यात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रजनीकांत यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी...