आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 15 वर्षे वेगळी राहिली मग घेतला घटस्फोट, बोल्ड सीनला या अॅक्ट्रेसची नव्हती हरकत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - जुन्या काळातील अॅक्ट्रेस सोनम तिचा 45वा वाढदिवस (2 सप्टेंबर) सेलिब्रेट करत आहे. बॉलिवूड चित्रपटांतून सेक्स सिम्बॉल नावाने प्रसिद्ध झालेल्या सोनमने तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने अॅक्टींग सोडण्याचा निर्णय घेतला होता. पीक टाइममध्ये अॅक्टींग सोडण्याचा निर्णय तिने घेतला होता. अॅक्टींग सोडून तिने डायरेक्टर राजीव रायशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघे 10 वर्षे एकमेकांबरोबर राहिले, नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघे 15 वर्षे वेगळे राहिले आणि अखेर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याचवर्षी एप्रिल महिन्यात सोनमने मुरली पोडुवल यांच्याशी दुसरे लग्न केले. 

'त्रिदेव'पासून सुरू झाली लव्ह स्टोरी.. 
'त्रिदेव' या सिनेमाच्या वेळीच दिग्दर्शक राजीव राय आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी तीन वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. तेव्हा ती केवळ 19 वर्षांची होती. राजीव रॉय यांचा 'विश्वात्मा' हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा हे दोघे पती-पत्नी होते. सोनमच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला. सोनमने विचार केला असता तर ती आणखी उंचीवर जाऊ शकली असती. परंतु, तिने राजीव आणि कौटुंबीक आयुष्याला अधिक पसंत केले.

सोनमने 6 वर्षांच्या करिअरमध्ये 30 चित्रपटांत काम केले. सोनमने बहुतांश चित्रपटांत भरपूर एक्सपोड केले. स्वतःपेक्षा दुप्पट वय असलेल्या हिरोबरोबरही तिने स्क्रीन शेयर केले. सोनमचे रियल नेम बख्तावर खान आहे. पण चित्रपटांसाठी तिने सोनम नाव निवडले. 
 

त्यावेळी सोनमचे सौंदर्यच तिची फिल्म इंडस्ट्रीतील ओळख होती. तोकडे कपडे घालून एक्स्पोज करायला तिची हरकत नसायची. तिचा बोल्ड अंदाज बघण्यासाठी प्रेक्षक थिएटरकडे वळत होते. सोनमच्या सिनेमात काही गाणी, एखाद-दोन बोल्ड आणि इमोशनल सीन्स असायचे. म्हणजेच तिला सिनेमात ग्लॅमरसाठी साईन करण्यात येत होते.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, सोनमशी संबंधित काही बाबी.. 
 
बातम्या आणखी आहेत...