एंटरटेनमेंट डेस्क - व्हर्सेटाईल अॅक्टर संजय मिश्रा आज 54 वा वाढिदवस (6 ऑक्टोबर) साजरा करत आहेत. 6 ऑक्टोबर 1963 रोजी बिहारच्या दरभंगा येथे संजय मिश्रा यांचा जन्म झाला होता. फार कमी लोकांना माहिती आहे की, अॅक्टर आणि कॉमेडियन म्हणून ओळख मिळवणारे संजय यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला होता, जेव्हा त्यांनी अॅक्टींग सोडून एका ढाब्यावर जाऊन नोकरी केली होती.
यामुळे सोडली होती अॅक्टींग..
- संजय यांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी ते, अॅक्टींग सोडून ऋषिकेशला गेले होते. त्याठिकाणी ते एका ढाब्यावर काम करायला लागले होते.
- संजय यांचे वडिलांबरोबर दृढ नाते होते. त्यांच्या मृत्यूने मिश्रा यांना एवढा धक्का बसला की, ते स्वतःला एकटे समजू लागले आणि अज्ञातवासात गेले.
- संजय यांनी शंभरहून अधिक चित्रपटांत काम केले होते. तरीही त्यांना हवे तसे यश मिळाले नव्हते.
- कदाचित त्यामुळेच ढाब्यावर काम करताना संजय यांना कोणी ओळखतही नव्हते. दिवस पुढे जात होते आणि संजय यांचा बहुतांश काळ, ढाब्यावर भाजी बनवणे, ऑम्लेट बनवणे यात जाऊ लागला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, संजय मिश्रा कसे परतले ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्याबाबत इतर माहिती...