आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Little Girl Harshaali Malhotra Is The Real Star Of Bajrangi Bhaijaan, See Her Pictures

\'बजरंगी भाईजान\'मध्ये सलमान-करीना नव्हे ही चिमुकली ठरली Real Star, पाहा खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'बजरंगी भाईजान\' या सिनेमाच्या वेगवेगळ्या दृश्यांत हर्षाली मल्होत्रा. - Divya Marathi
\'बजरंगी भाईजान\' या सिनेमाच्या वेगवेगळ्या दृश्यांत हर्षाली मल्होत्रा.
'बजरंगी भाईजान' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमात सलमान खान असल्याने साहजिकच सुरुवातीपासून या सिनेमाविषयीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सलमानसोबत दिसणा-या एका चिमुरडी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोड चेह-याची ही चिमुरडी आहे तरी कोण? याविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक झाले. ही क्यूट दिसणारी चिमुरडी आहे हर्षाली मल्होत्रा.. ('बजरंगी भाईजान'मधील या चिमुकलीने वेधले सर्वांचे लक्ष, जाणून घ्या तिच्याविषयी बरंच काही...)
सिनेमा बघितल्यानंतर सलमान, करीना आणि नवाजुद्दीन या बड्या स्टार्सपेक्षा ही चिमुरडीच प्रेक्षकांच्या लक्षात राहते. सिनेमात शाहिद उर्फ मुन्नी हे पात्र वठवणा-या हर्षालीने सिनेमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे. तोंडी एकही संवाद नाही, मात्र तरीसुद्धा तिने आपल्या प्रगल्भ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. पहिल्या शॉटपासून ते शेवटच्या शॉटपर्यंत हर्षालीने आपले काम उत्तम वठवले आहे. हर्षाली एक उत्तम अभिनेत्री असल्याचे करीना कपूर खानने या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये म्हटले होते. (काश्मिरमध्ये कडकडत्या थंडीत झाले 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग, पाहा छायाचित्रे)
सलमानसोबतचा स्क्रिनवरचा तिचा वावर बघता सिनेमाचा खरा स्टार तो नव्हे तर हर्षालीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सलमानच्या नावामुळे प्रेक्षक निश्चितच सिनेमा बघण्यासाठी थिएटरकडे वळतील, मात्र तेथून बाहेर पडताना हर्षालीचेच नाव त्यांच्या ओठी राहणार आहे. (वाचा 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा रिव्ह्यू...)
'बजरंगी भाईजान' हा सिनेमा तर अनेकांनी पाहिलाच असेल, मात्र पुन्हा एकदा हर्षालीची सिनेमातील झलक बघण्यासाठी उत्सुक असणा-यांसाठी आणि ज्यांनी अद्याप हा सिनेमा बघितला नाही, त्यांच्यासाठी आम्ही हर्षालीची सिनेमातील खास छायाचित्रे या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.. (का बघावा 'बजरंगी भाईजान' वाचा त्याची 7 कारणे)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'ची रिअल स्टार असलेल्या हर्षालीची खास झलक...