आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसची Real डिलिव्हरी झाली होती शूट, लेबर रुममध्ये लावण्यात आले होते 3 कॅमेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मॉडेल, टीव्ही अँकर आणि अभिनेत्री श्वेता मेननने 'अनास्वरम' या मल्याळम सिनेमाद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. सिनेमात कमबॅक करण्यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धांची ती विजेतीसुद्धा ठरली. 'थन्त्रा' या मल्याळम सिनेमाद्वारे तिने कमबॅक केले. 'किर्ती चक्र' आणि 'परेदसी' या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या.

श्वेताच्या आयुष्यातील एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे, 'कालीमन्नू' या सिनेमात तिच्या मुलीच्या जन्माचा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन शूट करण्यात आला होता. सिनेमात हा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन 45 मिनिटांचा होता. ब्लेसी या सिनेमाचे दिग्दर्शक होते. श्वेताने आपल्या मुलीचे नाव सबाइना असे ठेवले आहे. जाणून घेऊयात श्वेताविषयी... 

मल्याळम सिनेमांद्वारे सुरुवात... 
श्वेता मेनने कोझिकोड येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये तिने मल्याळम सिनेमांद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. 1994 मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला. अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणा-या श्वेताने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय आणि सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. 'पृथ्वी', 'इश्क', 'बंधन', 'शिकारी', 'अशोका', 'हां मैंने प्यार किया', 'कोई है..', 'प्राण जाए पर शान ना जाए', 'कहां हो तुम', 'मकबूल', 'मार्केट'सह जवळजवळ 30 बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. 

पुन्हा वळली मल्याळम फिल्म इंडस्ट्रीकडे...
2006 मध्ये श्वेताने पुन्हा एकदा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत रिएन्ट्री घेतली. याशिवाय काही टीव्ही शोज, अवॉर्ड फंक्शनचे अँकरिंगसुद्धा केले. 2011 मध्ये तिने मुंबईत स्थायिक असलेले श्रीवाल्सन मेननसोबत लग्न केले. 

लाइव्ह डिलिव्हरीचे चित्रीकरण...
श्वेताने 2013मध्ये आलेल्या 'कालीमन्नू' या सिनेमासाठी लाइव्ह डिलिव्हरीचा सीन शूट केला होता. दिग्दर्शक ब्लेसी यांनी श्वेताच्या मुलीच्या जन्माची घटना लाइव्ह रेकॉर्ड केली होती. लाइव्ह डिलिव्हरीचा 45 मिनिटांचा सीन सिनेमात टाकण्यात आला होता. दिग्दर्शक ब्लेसी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की श्वेता पाच महिन्यांची गर्भवती असल्यापासून डिलिव्हरीचे रेकॉर्डिंग सुरु करण्यात आले होते. 

लेबर रुममध्ये लावण्यात आले होते तीन कॅमेरे...
मुंबईतील नानावती हॉस्पिटलमध्ये श्वेताने मुलीला जन्म दिला. या हॉस्पिटलमधील लेबर रुममध्ये तीन कॅमेरे लावण्यात आले होते. यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सव्यतिरिक्त सिनेमाच्या प्रॉडक्शन टीममधील तीन मेंबर्स हजर होते. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया मिळाली होती. हा सिनेमा तेलगूमध्येही डब करण्यात आला होता. तेलगू सिनेमाचे शीर्षक होते 'माले टिगा'. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, श्वेताचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...