आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरीन खान दिसते हुबेहुब कतरिना कैफसारखी, या स्टार्सचे हे आहेत Look Alike

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः कतरिना कैफ, जरीन खान - Divya Marathi
फाइल फोटोः कतरिना कैफ, जरीन खान
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान 'हेट स्टोरी 3' या आगामी सिनेमात लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकणार आहे. येत्या 4 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात जरीनने आपल्या आजवरच्या करिअरमधील सर्वात बोल्ड भूमिका वठवली आहे.
2008 साली 'वीर' या सिनेमाद्वारे तिने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. सुपरस्टार सलमान खानसोबत झळकण्याची संधी तिला मिळाली होती. मात्र पहिलाच सिनेमा मोठ्या अभिनेत्यासोबत करुनदेखील तिला अद्याप यशाची चव चाखता आलेली नाही. सिनेमांमुळे जरी तिला प्रसिद्धी मिळाली नसली, तरी एका गोष्टीमुळे तिच्या नावाची नेहमीच चर्चा होत राहिली आहे. असे म्हटले जाते, की जरीन खान हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसले. 'वीर'च्या रिलीजनंतर जरीनचा कतरिनाची लूक अ लाइक म्हणूनच ओळखले जाऊ लागले. आता 'हेट स्टोरी 3' मधून जरीन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु शकेल का, हे पाहायचे आहे.
तसे पाहता, जरीन खानच नव्हे , तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना अॅक्टर-अॅक्ट्रेसेसच्या डुप्लिकेट्सच्या रुपात ओळखले जाते. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच काही सेलिब्रिटींविषयी...