आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी सलमान तर कुणी दिसतो रणबीरसारखा, हे आहेत स्टार्सचे Duplicates

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर, सलमान खान आणि त्याच्यासारखे हुबेहुब दिसणारा नजीम खान, खाली रणबीर कपूर आणि त्याच्यासारखा दिसणारा जुनैद खान - Divya Marathi
वर, सलमान खान आणि त्याच्यासारखे हुबेहुब दिसणारा नजीम खान, खाली रणबीर कपूर आणि त्याच्यासारखा दिसणारा जुनैद खान

मुंबई- वादग्रस्त टीव्ही शो म्हणून ओळखला जाणा-या 'बिग बॉस'चे नववे पर्व लवकरच सुरु होणारेय. या नवीन पर्वाचे प्रोमोच ऑनएअर सुरु झाले आहेत. काही स्पर्धकांची नावेही उघड झाली आहेत. बातम्यांनुसार, यंदाच्या पर्वात 'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेला अभिनेता नजीम खान सहभागी होणारेय. प्रॉडक्शन हाऊसच्या वतीन अद्याप याविषयी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. नजीम खान हुबेहुब सलमान खानप्रमाणे दिसतो. त्याने 'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमानचे यंगर व्हर्जन प्ले केले होते.
अनेक बॉलिवू़ड स्टार्सचे आहेत डुप्लिकेट्स...
सलमान खानचाच नव्हे तर या जगात अनेक बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट्स आहेत. उदाहरणार्थ, चॉकलेट बॉय रणबीर कपूरसारखा हुबेहुब दिसणारा तरुण काश्मीरमध्ये राहतो. त्याचे नाव जुनैद शाह असून त्याला निसर्गाने रणबीरसारखा चेहरा दिला आहे. जुनैदला मॉडेल बनण्याची इच्छा आहे. त्याला रणबीरचा हमशकल म्हणून ओळख निर्माण करण्याची इच्छा नाहीये. 'जुनैद शाह द अपकमिंग आर. के.' नावाने जुनैदचे फेसबुकवर एक पेज आहे. वरील छायाचित्रात तुम्ही पाहू शकता जुनैद हूबेहूब रणबीरसारखा दिसतो. एक नजर त्याच्याकडे पाहताच नजरही धोका खाते. जुनैद गेल्या काही दिवासांपासून फेसबुकवर लोकप्रिय होत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉलिवूड स्टार्सच्या डुप्लिकेट्सची छायाचित्रे...