आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॉइंग रुमपासून ते लिव्हिंग एरियापर्यंत, असा आहे बिग बींचा \'जलसा\', बघा बंगल्यांची खास झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद  येथे त्यांचा जन्म झाला. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेले अमिताभ बच्चन 4 आलिशान बंगल्यांचे मालक आहेत.  मुंबई त्यांचे प्रतीक्षा, जलसा, जनक आणि नैवेद्य या नावांचे चार आलिशान बंगले आहेत. जनक या बंगल्याचा वापर ते ऑफिससाठी करतात. तर 'जलसा'मध्ये ते त्यांच्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत.  
 
'प्रतिक्षा' आहे बिग बींचा पहिला बंगला...
- बिग बी यांचा मुंबईच्या जुहू परिसरात भव्यदिव्य बंगला आहे. सध्या अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबीयांसोबत 'जलसा'मध्ये राहतात. दोन मजल्याचे हे घर जवळपास 10 हजार चौरस फूटात आहे. 
- त्यांच्या मुंबईतील पहिल्या बंगल्याचे नाव 'प्रतिक्षा' आहे. 'जलसा'मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी ते 'प्रतिक्षा'मध्ये राहत होते. अनेक वर्षे अमिताभ आपल्या आई-वडिलांसोबत याच बंगल्यात राहिले. अभिषेक आणि श्वेताचे बालपणसुध्दा येथेच गेले. 
- तसेच 'जनक'मध्ये अमिताभ बच्चन यांचे कार्यलय आहे. येथे ते माध्यमांना आणि नातेवाईकांना भेटतात. 70च्या दशकाच्या अखेरीस अमिताभ 'प्रतिक्षा'मध्ये शिफ्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी 'जलसा' खरेदी केला होता. 
- याशिवाय बिग बींचे आणखी एक घर आहे. हे घर अमिताभ यांनी मल्टीनॅशनल बँकेला भाड्याने दिले आहे. यातील काही भाग बच्चन कुटुंबीय पार्ट्यांसाठी वापरतात.

असा मिळाला होता 'जलसा' हा बंगला
- बिग बींचा 'जलसा' हा बंगला 10,125 चौरस फूटात असून दोन मजली आहे. हे घर जया बच्चन यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.
- हे घर रमेश सिप्पी यांनी बिग बींना 'सत्ते पे सत्ता' (1982) या सिनेमाच्या मानधनाच्या रुपात दिले होते, असे म्हटले जाते.
- असेही ऐकिवात आहे, की टॅक्स कारणांमुळे जलसा हे घर बिग बींचे भाऊ अजिताभ यांची पत्नी रमोलाच्या नावी करण्यात आले होते. त्यानंतर 1993 सली रमोला यांनी भेटीच्या रुपात हे घर जया बच्चन यांना दिले.
- 2006 साली हे घर जया बच्चन यांच्या नावी झाले.
- जलसापासून पन्नास मीटच्या अंतरावर बिग बींचे ऑफिस आहे. त्याचे नाव 'जनक' आहे.
- जलसामध्ये एक फॅमिली जीम आहे.
- नैवेद्य हे घर बिग बींनी अभिषेक बच्चनसाठी घेतले होते.

कम्फर्टला प्राथमिकता
- बिग बींसाठी पहिली प्राथमिकता कम्फर्ट आहे. मग ते घराविषयी असो अथवा कपड्यांविषयी.
- त्यांच्या घरातील फरशी इटॅलिअन मार्बलची आहे.
- तसेच बाथरुम फिटिंग्स फ्रान्स आणि जर्मनीहून मागवल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिग बींच्या घरांची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...