आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 3 मुले आणि एका मुलीचे वडील आहेत विनोद खन्ना, दोनदा अडकले लग्नगाठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  दुसरी पत्नी कवितासोबत विनोद खन्ना, उजवीकडे वर 1971 मध्ये पहिल्या लग्नात पत्नी गीतांजलीसोबत विनोद,खाली दुसरी पत्नी कविता आणि मुलगी श्रद्धासोबत. - Divya Marathi
डावीकडे - दुसरी पत्नी कवितासोबत विनोद खन्ना, उजवीकडे वर 1971 मध्ये पहिल्या लग्नात पत्नी गीतांजलीसोबत विनोद,खाली दुसरी पत्नी कविता आणि मुलगी श्रद्धासोबत.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा गुरुवारी वाढदिवस असून ते वयाची 70 वर्षे पूर्ण करणार आहेत. 6 ऑक्टोबर 1946ला पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये. मध्यमवर्गीय कुटुंबातील विनोद बॉलिवूड अभिनेता होण्यापासून ओशो यांच्याशी प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत ते चर्चेत राहिले.
कॉलेजमध्ये पडले होते प्रेमात
भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंबीय मुंबईला आले होते. त्यांचे वडील टेक्सटाइल बिझनेसमन होते. मुंबई आणि दिल्लीमध्ये शाळेय शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजच्या दिवसांत विनोद इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत होते. विनोद सायन्सचे विद्यार्थी होते. मात्र त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की विनोद यांनी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यावे आणि शिक्षणानंतर घरातील बिझनेसशी जुडावे. विनोद यांच्या सांगण्यानुसार, कॉलेज लाइफमध्ये त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांना एक गर्लफ्रेंडसुध्दा होती. येथेच त्यांनी भेट गितांजलीसोबत झाली. गितांजली विनोद यांची पहिली पत्नी आहेत. कॉलेजपासूनच त्यांची लव्ह-स्टोरी सुरु झाली होती.

जेव्हा वडिलांनी दाखवला होता बंदूकीचा धाक
विनोद यांच्या सांगण्यानुसार, एका पार्टीदरम्यान त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली. ते एका सिनेमात आपल्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन चेह-याच्या शोधात होते. त्यांनी विनोद खन्ना यांना ती भूमिका ऑफर केली. मात्र याविषयी जेव्हा विनोद यांच्या वडिलांना माहित झाले तेव्हा त्यांनी विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवला. त्यांनी सांगितले, की तू सिनेमात काम केलेस मी तुला गोळी मारेल. मात्र विनोद यांच्या आईने वडिलांना समजावले आणि दोन वर्षांची मुदत दिली. वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा.

एका आठवड्यात साइन केले 15 सिनेमे
विनोद यांचा 'मन की मीत' हा पहिला सिनेमा होता. सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. त्यानंतर एक आठवड्यात विनोद यांनी जवळपास 15 सिनेमे साइन केले. सिनेमांत यश मिळाल्यानंतर विनोद आणि गितांजली यांनी लग्न केलेच दोघांना राहूल आणि अक्षय खन्ना ही दोन मुले आहेत.

ओशोंमुळे प्रभावित झाले विनोद
एकेकाळी विनोद कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते. असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले. विनोद पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जात होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले. डिसेंबर 1957मध्ये विनोद यांनी सिनेमांपासून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना 'सेक्सी सन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद अमेरिकेला निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्षे घालवली. तिथे ते बागकाम करायचे.

पहिली पत्नी गितांजलीशी तुटले नाते
4-5 वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांना संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यापासून दूर गेले. ते भारतात परतल्यानंतर त्यांना पत्नीने घटस्फोट दिला. कुटुंबीय दूर गेल्यानंतर 1987मध्ये विनोद यांनी 'इन्साफ' सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

1990मध्ये केले दुसरे लग्न
पुन्हा करिअरला सुरुवात केल्यानंतर विनोद यांनी 1990मध्ये कवितासोबत लग्न केले. दोघांना मुलगा साक्षी आणि मुलगी श्रध्दा ही दोन मुले आहेत.

1997मध्ये राजकारणात ठेवले पाऊल
1997मध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनल्यानंतर विनोद नेतासुध्दा झाले. राजकारणात सक्रिय विनोद खन्ना आता अनेक सिनेमांतसुध्दा दिसतात. सलमान खान स्टारर 'दबंग' सीरिजच्या सिनेमांत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. लवकरच विनोद शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' सिनेमात झळकणार आहेत.

पुढील स्लाइड्समध्ये बघा, विनोद खन्ना आणि त्यांच्या कुटुंबीयांची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...