आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते K3G मधली छोटी 'करीना', 15 वर्षांत एवढा बदलला LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अलीकडेच आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे बॅशमध्ये कपूर कुटुंबातील अनेक सदस्य सहभागी झाले होते. करीनाच्या बर्थडे पार्टीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृताची मुलगी सारा अली खान. करीनाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. यापैकीच एक गाजलेला सिनेमा म्हणजे कभी खुशी कभी गम. या सिनेमात करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी मालविका राज हिने साकारली होती.

300 मुलींमधून झाली होती मालविका राजची निवड...
कभी खुशी कभी गम या सिनेमाच्या रिलीजला आता 15 वर्षे लोटली आहेत. 14 डिसेंबर 2001 रोजी रिलीज झालेल्या अमिताभ-जया, शाहरुख खान-काजोल, हृतिक-करीना स्टारर या फॅमिली एन्टरटेर सिनेमाने प्रेक्षकांची वाहवाह मिळवली होती. K3G मध्ये करीनाच्या बालपणीची भूमिका मालविकाने साकारली होती. या15 वर्षांत तिच्या लूकमध्येही बराच बदल झाला आहे. divyamarathi.com ने अलीकडेच मालविकासोबत खास बातचित केली. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्यासोबतच करिअरशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. चला जाणून घेऊया काय म्हणतेय मालविका...
'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील बालकलाकाराची भूमिका कशी मिळाली ?
- ही खूप रंजक कहाणी आहे. मी शालेय दिवसात टॉम बॉय होती. फुटबॉल खेळताना मुलांना हरवत होते. करण जोहरचे त्यावेळचे सहायक दिग्दर्शक सोहम यांनी मला पाहिले होते. त्यांनी माझ्या शिक्षिकेकडे माझ्याविषयी चौकशी केली. सोहम यांनी माझा फोन नंबर मागितला. त्यावेळी माझा नंबर का हवा ? असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा प्राचार्यांना नंबर हवा, असे उत्तर मला मिळाले. आता प्रिंसिपल मला शाळेतून काढून टाकणार किंवा आणखी दुसरीही कुठली गोष्ट असू शकते, असे विचार माझ्या मनात आले. मात्र सोहम यांनी माझ्या आईला फोन केला आणि 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात मी करीनाच्या बालपणीची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली. करण आणि यश अंकल यांना माझे पापा आणि आजी ओळखत होते. सुरुवातीला माझे पापा यासाठी तयार नव्हते. त्यांच्या मते, आधी मी शिक्षण पूर्ण करावे. मात्र जेव्हा यश अंकल यांनी ऑडीशनसाठी पापांना फोन केला, तेव्हा त्यांनी होकार दिला. 300 मुलींमधून माझी या भूमिकेसाठी निवड झाली.

K3Gनंतर का सिनेमांमध्ये झळकली नाही मालविका... जाणून घ्या पुढील स्लाईडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...