आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समवयीन आहेत हे बॉलिवूड कलाकार, कुणी झाले HIT तर कुणी FLOP

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री)
मुंबई- श्रीदेवी स्टारर 'पुली' 1 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दिग्दर्शक चिंबू देवेनच्या या सिनेमात श्रीदेवी महाराणीच्या भूमिकेत दिसली आहे. 120 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात श्रीदेवी एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. सिनेमात तिने मनीष मल्होत्राचे डिझाइनर कॉस्ट्युम कॅरी केले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक ड्रेसचे वजन जवळपास 10 किलो आहे.
2012मध्ये रिलीज झालेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' सिनेमाच्या तीन वर्षांनंतर श्रीदेवी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 1963मध्ये जन्मलेली श्रीदेवी 'हिम्मतवाला', 'मिस्टर इंडिया', 'चांदनी, 'लम्हे'सारख्या सुपरहिट सिनेमांत झळकली आहे. आजसुध्दा श्रीदेवी बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींमध्ये सामील आहे. मात्र तिच्याच वयाच्या अभिनेत्री लाइमलाइटपासून दूर गेल्या आहेत. अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीदेखील श्रीदेवीच्या वयाची आहे. मात्र तिने आता बॉलिवूडला राम-राम ठोकला आहे. 1963मध्ये जन्मलेल्या 51 वर्षीय मीनाक्षीने राजकुमार संतोषच्या 'घायल' सिनेमातून सर्वांची मने जिंकली होती. मात्र आता ती सिनेमांपासून दूर आहे.
असे म्हटले जाते, की एज इज जस्ट ए नंबर. ही लाइन बॉलिवूड सेलेब्सवर शोभत नाही. वाढत्या वयासोबतच बी-टाऊनच्या सेलेब्सची क्रेजसुध्दा कमी होते. मात्र अनेक एव्हरग्रीन कलाकारांवर हा फॉर्मुला फिट होत नाही. अनेक एव्हरग्रीन कलाकार आहेत, ज्यांची वाढत्या वयातसुध्दा मागणी कमी झालेली नाहीये. आजसुध्दा हे कलाकार मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र त्यांच्या वयाचे स्टार्स रुपेरी पडद्यापासून दूर गेले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा समवयीन असलेल्या काही स्टार्सविषयी...